वाहन परवाना मिळण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST2021-09-07T04:50:47+5:302021-09-07T04:50:47+5:30

............... प्रवासी वाहनांमध्ये नियमाचे उल्लंघन वाशिम : शहरातील पुसद नाका, हिंगोली नाका, रिसोड नाका येथून विविध ठिकाणी अवैध प्रवासी ...

Delay in getting a driving license | वाहन परवाना मिळण्यास विलंब

वाहन परवाना मिळण्यास विलंब

...............

प्रवासी वाहनांमध्ये नियमाचे उल्लंघन

वाशिम : शहरातील पुसद नाका, हिंगोली नाका, रिसोड नाका येथून विविध ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. ही वाहने खचाखच भरून जात असून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक विभागाने लक्ष पुरवावे, अशी मागणी प्रमोद राठोड यांनी सोमवारी केली.

...............

संत्रा उत्पादकांना न्याय मिळण्याची प्रतीक्षा

वाशिम : २०२० मध्ये लॉकडाऊन काळात हैद्राबाद येथील ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये संत्रा साठवून ठेवण्यात आला. तो संबंधित दलालाने परस्पर विकला. याप्रकरणी मुंगळा येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी मालेगाव पोलिसात तक्रार दाखल करूनही अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही, अशी माहिती शेतकरी संतोष गजानन केळे यांनी दिली.

..............

डिझेलचे दर वाढल्याने नागरिक हैराण

वाशिम : पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून ऑटोचालक, मालवाहू वाहनधारक आणि कृषीमालाची ने-आण करणारे वाहनचालक अडचणीत सापडले आहेत. दिवसभर राबराब राबून हाती येणारा अधिकांश पैसा डिझेलमध्येच खर्च होत असल्याची माहिती ऑटोचालक राहुल गायकवाड याने दिली.

Web Title: Delay in getting a driving license