स्टेट बँकेच्या मानोरा शाखेकडून पीककर्ज वितरण संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:54 IST2021-06-16T04:54:33+5:302021-06-16T04:54:33+5:30
तहसीलदार तथा बँक प्रशासन मानोरा यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, बँक प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना ...

स्टेट बँकेच्या मानोरा शाखेकडून पीककर्ज वितरण संथगतीने
तहसीलदार तथा बँक प्रशासन मानोरा यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, बँक प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे व शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि इतर शेती विषयक खर्चासाठी दारोदार भटकावे लागण्याची पाळी येत असल्याचे नमूद केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मानोरा येथे खातेदार असलेल्या आणि कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांना मागील एक महिन्यांपासून तारीख पे तारीख देऊन त्यांना कर्जापासून वंचित ठेवण्याचा प्रकार बँक प्रशासनाने चालविलेला आहे. कोरोना या महामारीचे कारण दाखवून तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांना कर्जापासून बँक प्रशासन वंचित ठेवण्याचा डाव खेळत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. कर्जमाफीत बसलेल्या शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसांत तातडीने कर्जवाटप बँक प्रशासनाने न केल्यास कर्जापासून वंचित शेतकऱ्यांसोबत परिवर्तन शेतकरी संघटना बँकेसमोर आंदोलन करेल हा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात विवेकमामा, रोशन आडे आणि मनोहर राठोड यांनी देतेवेळी केला.