बसमध्ये आढळले मृत अर्भक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:50 IST2017-07-30T02:50:39+5:302017-07-30T02:50:39+5:30
पुसद ते अकोला या बसमधील एका बाकावर प्लास्टिक पिशवीत पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आले.

बसमध्ये आढळले मृत अर्भक !
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर: येथील बसस्थानकात शनिवारी दुपारच्या सुमारास एम.एच. ४० एन. ८१०२ क्रमांकाच्या पुसद ते अकोला या बसमधील एका बाकावर प्लास्टिक पिशवीत पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आले. पोटच्या गोळ्याला प्लास्टिक पिशवीत गुदमरून मारणाºया ‘त्या’ निर्दयी मातेचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
एम.एच. ४० एन. ८१०२ क्रमांकाची पुसद-अकोला ही बस सकाळी पुसदवरून अकोला गेली. परतीत अकोल्यावरून मंगरुळपीर बसस्थानकात काही वेळेसाठी थांबली असता, बसमधील प्रवासी उतरल्यानंतर वाहक जावेद खान जमीर उल्ला खान यांना बसच्या बाकावर प्लास्टिक पिशवी आढळल्याने त्यांनी तत्काळ वाहतूक निरीक्षकांना या प्रकाराची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी ‘त्या’ पिशवीची झडती घेतली असता, पुरुष जातीचे मृत अर्भक आढळून आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून सदर मृत अर्भक उत्तरीय तपासणीकरिता अकोला येथे पाठविले. याप्रकरणी भादंवि कलम ११८ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.