कॅनालमध्ये आढळला वृध्दाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 15:46 IST2019-05-29T15:45:50+5:302019-05-29T15:46:14+5:30
कोरड्या कॅनालमध्ये एका वृध्द इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना २९ मे रोजी सकाळ च्या सुमारास उघडकीस आली

कॅनालमध्ये आढळला वृध्दाचा मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
उंबर्डा बाजार : कारंजा ते दारव्हा मार्गावरील महादेव संस्थान डुंडा भगत टेकडी समोरील ॠषी तलावाच्या कोरड्या कॅनालमध्ये एका वृध्द इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना २९ मे रोजी सकाळ च्या सुमारास उघडकीस आली .
कारंजा दारव्हा मार्गावरील महादेव संस्थान डुंडा भगत टेकडी समोरील ॠषी तलावाच्या कोरड्या कॅनाल परिसरात उग्रवास येत असल्याने काही नागरिकांनी याचा शोध घेतला असता एका वयोवृद्ध अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला .
काही सुजाण नागरिकांनी घटनेची माहीती कारंजा शहर पोलीसांना दिली असता , कारंजा शहर पोलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर इसमाचा ब-याच दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचा कयास असल्याने चेहरा ओळखणे कठीण होवून सर्वत्र उग्र दुर्गंधी पसरली होती . घटनेचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहे.