‘फीव्हर क्लिनिक’मधील गर्दी ओसरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:19+5:302021-06-10T04:27:19+5:30

दुसऱ्या लाटेत वाशिम शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळून आली होती. एप्रिल व मे महिन्यांत शहरासह ...

The crowd at the Fever Clinic has subsided! | ‘फीव्हर क्लिनिक’मधील गर्दी ओसरली !

‘फीव्हर क्लिनिक’मधील गर्दी ओसरली !

Next

दुसऱ्या लाटेत वाशिम शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळून आली होती. एप्रिल व मे महिन्यांत शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. सुदैवाने जून महिन्यात कोरोनाचा आलेख घसरल्याने तालुकावासीयांना दिलासा मिळत आहे. सर्दी, ताप व खोकला अशी लक्षणे असणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी तालुकास्तरावर फीव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. ताप, सर्दी व खोकला हे तसे नेहमीचे आजार आहेत. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसतात. ताप, सर्दी व खोकला आदी लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींची तपासणी, उपचार करण्यासोबतच त्यांच्या प्रवासाची नोंदसुद्धा फीव्हर क्लिनिकमध्ये केली जाते. जून महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या घटली; याबरोबरच फीव्हर क्लिनिकमधील गर्दीही ओसरल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे कोरोनाचा धोका अजून टळला नसल्याने यापुढेही नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. सर्दी, ताप व खोकला अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी फीव्हर क्लिनिकमध्ये चाचणीसाठी जावे, असे आवाहन तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

Web Title: The crowd at the Fever Clinic has subsided!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.