वाशिम तालुक्यात क्रॉपसॅप प्रकल्पातर्गं हरभरा पिकाची पाहणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:05 PM2017-12-30T14:05:05+5:302017-12-30T14:06:14+5:30

वाशिम : तालुक्यातील मौेजे पांगरखेडा येथे उपविभागीय कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी वसंत किसन मारकड यांच्या शेतात हरभरा पिकाची पाहणी किड नियंत्रक मिलींद कांबळे यांच्या नियंत्रणाखाली किड सर्वेक्षण सुनिल जाधव यांनी शेतकºयांच्या शेतात जाउन केली.

CropSap project in Washim taluka farmers fields | वाशिम तालुक्यात क्रॉपसॅप प्रकल्पातर्गं हरभरा पिकाची पाहणी 

वाशिम तालुक्यात क्रॉपसॅप प्रकल्पातर्गं हरभरा पिकाची पाहणी 

Next
ठळक मुद्देशेतात पक्षीथांबे उभारावे यामुळे काही प्रमाणात अळीवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल असे  सांगितले . फवारणी करतेवेळी काहीच खाउ नये यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

वाशिम : तालुक्यातील मौेजे पांगरखेडा येथे उपविभागीय कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी वसंत किसन मारकड यांच्या शेतात हरभरा पिकाची पाहणी किड नियंत्रक मिलींद कांबळे यांच्या नियंत्रणाखाली किड सर्वेक्षण सुनिल जाधव यांनी शेतकºयांच्या शेतात जाउन केली. यावेळी शेतकºयांना मार्गदर्शन सुध्दा करण्यात आले. यावेळी किड सर्वेक्षक सुनिल जाधव यांनी उपस्थित शेतकºयांना सांगितले की,  हरभºयावर येणारी घाटे अळी आणि मर रोगाबाबत दक्षता बाळगणे आवश्यक आहे. अळींचे हरभरा हे पिक आवडते खाद्य आहे. ही अळी सुरवातीला पानाच्या खालच्या बाजूस राहून पाने कुरतडून खाते, त्यामुळे मोठे नुकसान होउ शकते . पिकाच्या एक मिटर लांब ओलीत १ ते २ अळया आढळून आल्यास १ हेक्टर क्षेत्रत ४ ते ५ कामगंध सापळे लावावे आणि शेतात पक्षीथांबे उभारावे यामुळे काही प्रमाणात अळीवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल असे  सांगितले . तसेच फेरोमन सापळयाविषयी महत्व पटवून दिले आणि हेलीनूर गोळी विषयी माहिती सांगितली. तुर पिकाविषयी तुरी वरील मुख्यकिड म्हणजे शेंगा पोखरणारी अळी असून त्या अळीमुळे  आर्थिक नुकसान जास्त प्रमाणात होउ शकते.  त्या शेंगा ेपोखरणाºया अळीच्या नियंत्रणाकरिता इमामेक्टिन बेंझोएट ५ एसजी ४.५ ग्रॅम किंवा इंथिआॅन ५० ईसी २० मिली किंवा फलबेंडाईट ३९.३५ एजी २ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .  फवारणी करते वेळी अंगरक्षक कपडे, चष्मा, मास्क, हातमोचे इत्यादींनी वापर करुनच फवारणी करावी .फवारणी करतेवेळी काहीच खाउ नये यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी वसंता मारकड, नामदेव मारकड दादाराव गायकवाड, अशोक मारकड, भिका गायकवाड, संतोष महाजन, अशोक मस्के, मनोहर महाजन, पांडूरंग कृउगीर, देविदास गाय

Web Title: CropSap project in Washim taluka farmers fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम