शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

कारंजा शहरातील दगडफेक, दुकान तोडफोडप्रकरणी ३५ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 5:41 PM

Viloance in Karanja : दोघांना अटक केली असून, शहरवासियांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.

कारंजा लाड : त्रिपुरा राज्यातील घटनेचे शुक्रवारी (दि.१२) कारंजात पडसाद उमटल्यानंतर, दुकानांची तोडफोड आणि दगडफेकप्रकरणी शनिवारी (दि.१३) जवळपास ३५ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. दोघांना अटक केली असून, शहरवासियांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.त्रिपुरा राज्यातील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी मुस्लिम संघटनेच्यावतीने शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार कांरजातील व्यावसायिकांनाही दुकाने बंद करण्यास संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले असता काही दुकानदारांनी दुकाने बंद करण्यास नकार दिला. त्यावरून शहरातील तीन दुकानांची तोडफोड करून दगडफेक केली होती. यासंदर्भात गजानन जगदेव पारधी यांनी कारंजा शहर पोलीसात तक्रार दाखल केली असून, पोलीसांनी अज्जु, मो. वसीम मो इब्राहीम, अब्दुल समीर अब्दुल आरीफ, युसुफ खान सुल्तान खाना, शेख सोहेल शेख कौसर व फिरोज कासम प्यारेवाले यांच्यासह ३० ते ३५ अज्ञात व्यक्तींविरूध्द भांदविच्या ३०७, ४५२, २९४, ४२७, १४३, १४९, १३५ मुंबई पोलीस अ‍ॅक्ट व इतर अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मो. वसीम व फिरोज कासम यांना अटक करण्यात आली. कर्तव्यावर असणाºया उमेश हरिश्चंद्र चचाणे या पोलीस कर्मचाºयाला आरोपींनी मारहाण केल्याने त्यांच्याविरूध्द भांदविच्या कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहेत. मिश्रवस्तीत पोलिसांचे पथसंचलनकारंजा शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अतिरीक्त जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांनी १३ नोव्हेंबर रोजी कारंजा येथे भेट देउन परिस्थितीची पाहणी केली तसेच त्यांच्या उपस्थिती शहर पोलिसांनी शहरातील मिश्र वस्तीतुन पथसंचलन करून शहर वासियांना शांततेचे आवाहन केले. या पथसंचलनात गोरख भामरे यांच्यासह प्रभारी उपविभागीय अधिकारी अनिल ठाकरे व ठाणेदार आधारसींग सोनोने, ७ अधिकरी, ४० कर्मचारी, ५ वाहन व एक क्युआरटी व आरसीपी पथक सहभागी झाले होते. शहर पोलिस स्टेशन परीसरातुन या पथसंचलनास सुरूवात झाली. त्यानंतर शहरातील मिश्र वस्तीतुन मार्गक्रमण करीत शहर पो.स्टे. परीसरातच पथ संचलनाचा समारोप करण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाCrime Newsगुन्हेगारी