शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

मालेगांव येथील ६०० थकित करदात्यांना न्यायालयामार्फत नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 4:33 PM

मालेगांव (वाशिम) - मालेगाव नगरपंचायत अंतर्गत जवळपास एक करोड रुपये थकीत कर असून तो कर वसूल करण्यासाठी मालेगाव नगरपंचायत आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय मालेगाव यांच्यामार्फत कर वसुली करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगांव (वाशिम) - मालेगाव नगरपंचायत अंतर्गत जवळपास एक करोड रुपये थकीत कर असून तो कर वसूल करण्यासाठी मालेगाव नगरपंचायत आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय मालेगाव यांच्यामार्फत कर वसुली करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली आहे. त्याअंतर्गत मालेगाव शहरातील ६०० थकित करदात्यांना न्यायालयामार्फत नोटीस बजावण्यात आली.मालेगाव नगरपंचायत स्थापन होऊन जवळपास तीन वर्षाचा कालावधी होत आहे. यापूर्वी ज्या वेळेस नगरपंचायत स्थापन झाली होती, त्यावेळी तत्कालीन तहसीलदार सोनाली मिटकरी यांच्या मार्फत थकित कर वसुली करण्यात आली होती. त्यावेळेस लाखो रुपयांचा कर मालेगाव नगरपंचायत जमा झाला होता. त्यानंतर गेल्या तीन वर्षात वसुली अद्यापर्यंत झालेली नाही. नगरपंचायतचा पाच हजार रुपयांच्या वर कर थकित असणार्‍या नागरिकांना तालुका विधी समिती अंतर्गत न्यायालयामार्फत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात असे नमूद केले आहे की न्यायालयासमोर महाराष्ट्र राज्य लोकन्यायालय नियम १९८६ चे कलम १ अन्वये प्रकरण दाखल करण्यात आले आहे. त्या अंतर्गत प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन मालेगाव येथे ८ डिसेंबर रोजी केले आहे. यावेळी नागरिकांना आलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. मालेगाव नगरपंचायतने लावलेला कर योग्य की अयोग्य आहे याबाबत आपले म्हणणे नागरिकांना मांडता येईल. थकीत सर्व कर भरला तर नियमाप्रमाणे व्याज व रक्कम मध्ये सूट सुद्धा देणार आहे. नोटिस दिल्यापासून आजपर्यत केवळ ६ लाख रुपये कर वसूल झाला आहे. अद्यपहि ९२ लाख रुपये कर बाकी आहे.

" ज्या नागरिकांकडे पाच हजाराच्या वर कर थकीत आहे अशा ६०० थकित करदात्यांना न्यायालयामार्फत नोटीस पाठवण्यात आले आहेत. त्याकरता ८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत चे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्याकडील थकित कर भरून मालेगाव नगरपंचायतना सहकार्य करावे.-मनोज सरदार, कर निरीक्षकनगर पंचायत, मालेगांव

टॅग्स :washimवाशिमTaxकरCourtन्यायालय