मालेगांव येथील ६०० थकित करदात्यांना न्यायालयामार्फत नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 16:33 IST2018-12-05T16:33:07+5:302018-12-05T16:33:38+5:30
मालेगांव (वाशिम) - मालेगाव नगरपंचायत अंतर्गत जवळपास एक करोड रुपये थकीत कर असून तो कर वसूल करण्यासाठी मालेगाव नगरपंचायत आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय मालेगाव यांच्यामार्फत कर वसुली करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली आहे.

मालेगांव येथील ६०० थकित करदात्यांना न्यायालयामार्फत नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगांव (वाशिम) - मालेगाव नगरपंचायत अंतर्गत जवळपास एक करोड रुपये थकीत कर असून तो कर वसूल करण्यासाठी मालेगाव नगरपंचायत आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय मालेगाव यांच्यामार्फत कर वसुली करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली आहे. त्याअंतर्गत मालेगाव शहरातील ६०० थकित करदात्यांना न्यायालयामार्फत नोटीस बजावण्यात आली.
मालेगाव नगरपंचायत स्थापन होऊन जवळपास तीन वर्षाचा कालावधी होत आहे. यापूर्वी ज्या वेळेस नगरपंचायत स्थापन झाली होती, त्यावेळी तत्कालीन तहसीलदार सोनाली मिटकरी यांच्या मार्फत थकित कर वसुली करण्यात आली होती. त्यावेळेस लाखो रुपयांचा कर मालेगाव नगरपंचायत जमा झाला होता. त्यानंतर गेल्या तीन वर्षात वसुली अद्यापर्यंत झालेली नाही. नगरपंचायतचा पाच हजार रुपयांच्या वर कर थकित असणार्या नागरिकांना तालुका विधी समिती अंतर्गत न्यायालयामार्फत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात असे नमूद केले आहे की न्यायालयासमोर महाराष्ट्र राज्य लोकन्यायालय नियम १९८६ चे कलम १ अन्वये प्रकरण दाखल करण्यात आले आहे. त्या अंतर्गत प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन मालेगाव येथे ८ डिसेंबर रोजी केले आहे. यावेळी नागरिकांना आलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. मालेगाव नगरपंचायतने लावलेला कर योग्य की अयोग्य आहे याबाबत आपले म्हणणे नागरिकांना मांडता येईल. थकीत सर्व कर भरला तर नियमाप्रमाणे व्याज व रक्कम मध्ये सूट सुद्धा देणार आहे. नोटिस दिल्यापासून आजपर्यत केवळ ६ लाख रुपये कर वसूल झाला आहे. अद्यपहि ९२ लाख रुपये कर बाकी आहे.
" ज्या नागरिकांकडे पाच हजाराच्या वर कर थकीत आहे अशा ६०० थकित करदात्यांना न्यायालयामार्फत नोटीस पाठवण्यात आले आहेत. त्याकरता ८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत चे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्याकडील थकित कर भरून मालेगाव नगरपंचायतना सहकार्य करावे.
-मनोज सरदार, कर निरीक्षक
नगर पंचायत, मालेगांव