Corona's 'blow' to firecracker traders in Washim | फटाका व्यावसायिकांना काेराेनाचा ‘फटका’

फटाका व्यावसायिकांना काेराेनाचा ‘फटका’

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  :   दीपावलीनिमित्त बाजारपेठेत माेठी उलाढाल झाली असली तरी फटाका व्यावसायिकांना मात्र फार माेठा फटका बसल्याचे व्यापाऱ्यांच्या चर्चेवरुन दिसून येते. 
गतवेळीच्या दीपावलीला जाेरदार पाऊस सुरु झाल्याने फटाका व्यवसायावर परिणाम झाला हाेता. परंतु दीपावलीच्या अगाेदरल्या काही दिवसाआधी बऱ्याप्रमाणात मालाची विक्री झाली हाेती. यावेळी मात्र काेराेना संसर्ग व प्रशासनाच्या आवाहनामुळे फटाका माकेर्टला माेठया  प्रमाणात फटका सहन करावा लागला. फटाका व्यावसायिकांकडून दिवाळीनिमीतत् आधिच फटाके आणण्याचे नियाेजन केले जाते., यावेळी जिल्हा प्रशासनाने साध्या पध्दतीने दिवाळी साजरी करा व शक्यताेवर फटाके फाेडणे टाळा असे आवाहन केल्याने याचा माेठा परिणाम व्यवसायावर झाला.


मागच्या दिवाळीला पाऊस असल्याने तर यावषीर् काेराेना संसर्ग व प्रशासनाच्या आवाहनामुळे फटाका व्यावसायिकांचे माेठया प्रमाणात नुकसान झाले. 
- प्रांजल भुरे, फटाका व्यावसायिक

Web Title: Corona's 'blow' to firecracker traders in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.