शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

’कोरोना’ राजकारण करण्याचा विषय नव्हे - गृहमंत्री अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 1:38 PM

व्हीडीओ व्हायरल करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे योग्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

- नंदकिशोर नारे

वाशिम : संपूर्ण राज्यात कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा जिवापाड मेहनत घेवून काम करीत आहे. काही राजकारणी मात्र राजकारण करीत आहेत, कोरोनाबाबत राजकारण करणाºया राजकारणाºयांना सांगू इच्छितो की, हा राजकारण करण्याचा विषय नव्हे.  याबाबत राजकारण न करण्याचे आवाहन मी करतोय. कोणी काय काय व्हीडीओ व्हायरल करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे योग्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत २७ मे रोजी बोलत होते.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना राज्यात कोरोनाच्या पृष्ठभूमिवर करण्यात आलेल्या उपाय योजनांसह कोरोनाशी निगडीत विषयासंबधित सविस्तर माहिती दिली. राज्यातील पोलिसांना विविध कोविड रुग्णालयामध्ये उपचाराकरिता सहाय्य मिळण्यासाठी कोविड हेल्पलाईन सुरु करण्यात आली. तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाकडून साडेसात लाख मास्क ज्यामध्ये दीड लाख एन- ९५, सहा लाख ३ प्ले, १५ हजार लिटर सॅनिटायझर, २२ हजार फेस शिल्ड, ४४ हजार हॅन्डग्लोजव ड्रोनचा समावेश आहे ज्याची किंमत जवळपास ४ कोटी रुपये इतकी आहे. याउपरही आवश्यकता भासल्यास पोलीस कल्याण निधीतून खरेदीचे अधिकार सर्व घटक प्रमुखांना देण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी रुषिकेष मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेसी, खा. भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अमित झनक, शुभदा नायक आदिंची उपस्थिती होती.

पोलीस कर्मचाºयांना कर्तव्यात सूट

कोरोनाच्या पृष्ठभूमिवर ५० वर्षावरील पोलीस कर्मचारी यांना जनतेच्या संपर्कातील कुठलेही कर्तव्य न देण्याचे व ५५ वर्षवरील पोलीस कर्मचारी यांना पगारी रजा देण्याची सूट देण्यात आली आहे. तसेच हुतात्मा निधीतून मरण पावलेल्या कर्मचाºयांच्या वारसांना १० लाख रुपये देण्यात येत आहेत. पोलीसांची काळजी घेण्यासाठी कोविड कक्ष स्थापन करुन नोडल अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे.

 

कोरोना विषाणुचा राज्यात संसर्ग होत असतांना वाशिम जिल्हयातील बोरकर नामक पोलीस कर्मचाºयाचा मृत्यू झाला होता याबाबत पत्रकार परिषदेत श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. तसेच त्या कर्मचाºयाच्या कुटुंबियाला शासकीय मदत दिल्या जाणार असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखcorona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम