शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

कोरोनामुळे केशकर्तनालय व्यावसायिकांची आर्थिक कोंडी - पवन कणखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:23 PM

महाराष्ट्र सलून, पार्लर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पवन कणखर यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूच्या संकटाने भारतातही विशेषत: महाराष्ट्रात हाहाकार माजविला आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी  मध्यंतरी लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर शिथिलता देत बहुतांश दुकाने सुरू करण्यास मुभा मिळाली. केशकर्तनालयेदेखील १० दिवस सुरू ठेवली; परंतू ३१ मे नंतर पुन्हा केशनकर्तनालये, पार्लर बंद ठेवण्यात आल्याने व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. तीन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने त्यांच्यासमोर नेमके कोणते प्रश्न निर्माण झाले, त्यावर उपाययोजना काय यासंदर्भात महाराष्ट्र सलून, पार्लर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पवन कणखर यांच्याशी साधलेला हा संवाद...

केशकर्तनालये बंद असल्याने नेमक्या कोणत्या समस्या आपणास उद्भवल्या आहेत?२४ मार्चपासून लॉकडाऊन असल्याने केशकर्तनालये, पार्लर बंद ठेवण्यात आले. त्याला आमचा अजिबात विरोध नाही. लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्याने बहुतांश दुकाने सुरू झाली. परंतू, केशकर्तनालये व पार्लर बंद ठेवण्यात आली. त्यामुुळे गोरगरीब व्यावसायिकांसह कुटुंबियावर उपासमारीची वेळ येत आहे. ७० टक्के व्यावसायिकांकडे स्वत:ची दुकाने नसून, ती भाड्याने घेतली आहेत. तीन महिन्यांपासून धंदा बंद आणि त्यात दुकानाचे भाडेही भरावे लागत असल्याने आर्थिक पेच निर्माण झाला आहे. दुकाने अजून किती दिवस बंद ठेवणार याचा कालावधी निश्चित नसल्याने केशकर्तनालय व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे.

आर्थिक कोंडी फोडण्यासाठी सरकारकडे काही मागण्या केल्या का?इतर व्यवसायाप्रमाणेच काही अटी व शर्तीच्या अधिन राहून केशकर्तनालये, पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी किंवा सरकारने रोख अर्थिक मदत देऊन केशकर्तनालाचा व्यवसाय बंद ठेवण्यास सांगावे, दुकानाचे भाडे तसेच विद्युत देयक हे सहा महिन्यांसाठी माफ करावे, कोरोनामुळे केशकर्तनालय व्यावसायिकाचा मृत्यू झाल्यास विमा कवच द्यावे. केशकर्तनालय, पार्लर व्यवसाय बंद असल्याने आणि दुसरा व्यवसाय सुरू करण्यासाठी परत गुंतवणूक करावी लागणार असल्याने व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. काटकसर करून तीन महिने घरी बसून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आता कठीण परिस्थिती आहे. केशकला बोर्ड स्थापन करावे...दिल्ली, कर्नाटक सरकारने केशकर्तनालय, पार्लर व्यावसायिकांना भरीव स्वरुपात मदत केली. त्याप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेदेखील आर्थिक मदत करावी, केशकला बोर्ड स्थापन करून निधी उपलब्ध करून द्यावा, पुढच्या नवीन नियमावलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात केशकर्तनालय, पार्लर व्यवसाय चालू करण्यास परवानगी द्यावी, लॉकडाऊनच्या कालावधीत व्यवसाय ठप्प असल्याने एका महिन्याचे किमान १५ हजार रुपये मानधन याप्रमाणे प्रत्येक व्यावसायिकाला मदत करावी.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत