Corona Cases in Washim : आणखी दोन पॉझिटिव्ह; एक कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 19:12 IST2021-09-11T19:12:33+5:302021-09-11T19:12:39+5:30
Corona Cases in Washim : ११ सप्टेंबर रोजी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर एका जणाने कोरोनावर मात केली.

Corona Cases in Washim : आणखी दोन पॉझिटिव्ह; एक कोरोनामुक्त
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून, शनिवार ११ सप्टेंबर रोजी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर एका जणाने कोरोनावर मात केली. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,७३१ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. वाशिम शहरातही रुग्णसंख्या कमी आढळून येत असल्याचे आशादायी चित्र आहे. शनिवारी जिल्ह्यात दोन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले तर एका जणाने कोरोनावर मात केली. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,७३१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१,०७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून संपलेला नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
१४ सक्रिय रुग्ण
शनिवारच्या अहवालानुसार नवीन दोन रुग्ण आढळून आले तर एकाने कोरोनावर मात केली. सध्या गृहविलगीकरणात १४ रुग्ण असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
चार तालुके निरंक
शनिवारच्या अहवालानुसार रिसोड तालुक्यातील वनोजा येथे एक आणि मंगरूळपीर तालुक्यातील मोहरी येथे एक रुग्ण आढळून आला. उर्वरित मालेगाव, वाशिम, कारंजा व मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.