Corona Cases in Washim : आणखी सात जणांचा मृत्यू; ४०६ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 17:54 IST2021-05-20T17:54:00+5:302021-05-20T17:54:09+5:30
Corona Cases in Washim: २० मे रोजी आणखी सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४०६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

Corona Cases in Washim : आणखी सात जणांचा मृत्यू; ४०६ पॉझिटिव्ह
वाशिम : तीन दिवसानंतर जिल्ह्यात कोरोनाचा कहर पुन्हा दिसून येत असून, गुरूवार, २० मे रोजी आणखी सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४०६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३७२७७ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. गत तीन दिवसांत कोरोनाबळी आणि नवीन रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना, गुरूवारी पुन्हा सात जणांचा मृत्यू तर ४०६ जणांना कोरोना संसर्ग झाल्याची नोंद घेण्यात आली. सात जणांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान, वाशिम तालुक्यात चार दिवसानंतर सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे. गुरूवारच्या अहवालानुसार वाशिम तालुक्यात ११२ तर सर्वात कमी रुग्ण मानोरा तालुक्यात १८ आढळून आले. दुसरीकडे नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते. गुरूवारी ४०६ नव्याने रुग्ण आढळून आले तर ४६७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील २० बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांचा आलेख खाली येत असला तरी धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे कुणीही गाफील राहू नये. कुठेही गर्दी न करता कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
४१०१ सक्रिय रुग्ण
गुरूवारच्या अहवालानुसार नव्याने ४०६ रुग्ण आढळून आले तर ४६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ४१०१ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000