शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ४६७ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:51 AM

Corona Cases in Washim: ११ मे रोजी आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४६७  जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार, ११ मे रोजी आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४६७  जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३३०१३ वर पोहोचला आहे.मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे मंगरुळपीर तालुक्यात आढळून आले आहेत. वाढीव कोरोना चाचण्यांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या स्थिर असली तरी कोरोनाचा आलेख खाली येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात आणखी एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद मंगळवारी घेण्यात आली. एकूण ४६७ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम ७२, मालेगाव तालुक्यातील ६८, रिसोड तालुक्यातील ५७, मंगरूळपीर तालुक्यातील १०७, कारंजा तालुक्यातील ८४ आणि मानोरा तालुक्यात ३० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील २९ बाधिताची नोंद झाली असून ६८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

वाशिम तालुक्यातील रुग्णसंख्येत घट मंगळवारी प्राप्त अहवालानुसार गत आठ दिवसात पहिल्यांदाच वाशिम तालुक्यातील रुग्णसंख्येत घट आल्याचे दिसून आले. वाशिम तालुक्यात ७२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे मंगळवारच्या अहवालानुसार समोर आले. त्या तुलनेत मंगरुळपीर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या जवळजवळ दुपटीने वाढली आहे. वाशिम शहरासह तालुक्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी कोरोनाविषयक नियमाचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

६८० जणांची कोरोनावर मातमंगळवारच्या अहवालानुसार नव्याने ४६८ रुग्ण आढळून आले तर तब्बल ६८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, ही बाब जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ठरणारी आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल व खासगी कोविड हॉस्पिटल येथे जवळपास ९५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर उर्वरीत जवळपास ३४०० रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या