Corona Cases in Washim : ४१ जणांची कोरोनावर मात; १७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 18:05 IST2021-06-23T18:05:21+5:302021-06-23T18:05:34+5:30
Corona Cases in wahim : ४१ जणांची कोरोनावर मात केली; १७ पॉझिटिव्ह आढळून आले.

Corona Cases in Washim : ४१ जणांची कोरोनावर मात; १७ पॉझिटिव्ह
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून बुधवार, २३ जून रोजी ४१ जणांनी कोरोनावर मात केली तर १७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,३०८ वर पोहोचला आहे. दरम्यान आणखी एका मृत्यूची नोंद सोमवारी घेण्यात आली.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. बुधवारी नव्याने १७ रुग्ण आढळून आले तर ४१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कारंजा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम तालुक्यात पाच, रिसोड तालुक्यात एक, मालेगाव तालुक्यात चार, मंगरूळपीर तालुक्यात चार, मानोरा तालुक्यात एक असे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ४१,३०८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०३९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६१५ जणांचे मृत्यू झाले. जिल्ह्याबाहेरील २ बाधितांची नोंद झाली. कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी धोका संपूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
३०१ सक्रिय रुग्ण
बुधवारच्या अहवालानुसार नव्याने १७ रुग्ण आढळून आले तर ४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ३०१ रुग्ण सक्रिय आहेत.
कारंजा तालुका निरंक
बुधवारच्या अहवालानुसार कारंजा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम शहरात दोन तर ग्रामीण भागात तीन, रिसोड तालुक्यात एक, मालेगावच्या ग्रामीण भागात चार, मंगरूळपीर शहरात दोन तर ग्रामीण भागात दोन आणि मानोराच्या ग्रामीण भागात एक रुग्ण आढळून आला.