Corona Cases in Washim : ३६ जणांची कोरोनावर मात; ९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 19:14 IST2021-06-29T19:14:46+5:302021-06-29T19:14:51+5:30
Corona Cases in Washim: २९ जून रोजी ३६ जणांनी कोरोनावर मात केली तर ९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

Corona Cases in Washim : ३६ जणांची कोरोनावर मात; ९ पॉझिटिव्ह
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून मंगळवार, २९ जून रोजी ३६ जणांनी कोरोनावर मात केली तर ९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,३९७ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी नव्याने ९ रुग्ण आढळून आले तर ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. वाशिम, मानोरा व मालेगाव तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. रिसोड तालुक्यात १, मंगरूळपीर तालुक्यात ५, कारंजा तालुक्यात ३ असे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ४१,३९७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०५६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
२०९ सक्रिय रुग्ण
रविवारच्या अहवालानुसार नव्याने ९ रुग्ण आढळून आले तर ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण २०९ रुग्ण सक्रिय आहेत.
एका मृत्यूची नोंद
मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या आणखी एका मृत्यूंची नोंद पोर्टलवर झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ६१९ जणांचे मृत्यू झाले.