शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Washim : २७ जणांची कोरोनावर मात; १६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 18:45 IST

Corona Cases in Washim: शनिवार, २६ जून रोजी २७ जणांनी कोरोनावर मात केली तर १६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून शनिवार, २६ जून रोजी २७ जणांनी कोरोनावर मात केली तर १६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,३६० वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. शनिवारी नव्याने १६ रुग्ण आढळून आले तर २७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम तालुक्यात २, रिसोड तालुक्यात ४, मालेगाव तालुक्यात २, मंगरूळपीर तालुक्यात २,  कारंजा तालुक्यात ६ असे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ४१,३६० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०४७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६१७ जणांचे मृत्यू झाले. कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी धोका संपूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.

 २७१ सक्रिय रुग्णशनिवारच्या अहवालानुसार नव्याने १६ रुग्ण आढळून आले तर २७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण २७१ रुग्ण सक्रिय आहेत. मानोरा तालुका निरंकशनिवारच्या अहवालानुसार मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम शहरात १ तर ग्रामीण भागात १, रिसोड शहरात २ तर ग्रामीण भागात २, मालेगावच्या ग्रामीण भागात २, मंगरूळपीर शहरात १ तर ग्रामीण भागात १ आणि कारंजा शहरात १ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण आढळून आले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या