शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांचे थकीत मानधन मिळणार दिवाळीपुर्वी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:57 IST

८५ कोटींची जमा असलेली रक्कम आरजीएसएने अग्रीम स्वरूपात ‘सीएससी-एसपीव्ही’ला अदा करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यभरातील आपले सरकार सेवा केंद्रांवर कार्यरत संगणक परिचालकांचे काही महिन्यांचे मानधन थकीत आहे. ते दिवाळीपुर्वी अदा करण्यात यावे, अशा सूचना महाराष्ट्र शासनाने कार्यासन अधिकारी यांनी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या (आरजीएसए) प्रकल्प संचालकांना दिल्या आहेत. त्यासाठी आवश्यक ८५ कोटींची जमा असलेली रक्कम आरजीएसएने अग्रीम स्वरूपात ‘सीएससी-एसपीव्ही’ला अदा करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.यासंदर्भातील पत्रात नमूद करण्यात आले आहे, की शासन निर्णयातील तरतूदी तसेच सीएससी-एसपीव्ही यांच्यासमवेत झालेल्या करारानुसार आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींकडून आवश्यक तो मोबदला अदा करणे बंधनकारक आहे; मात्र काही ग्रामपंचायतींनी पुरविण्यात आलेल्या सेवांची देयके पारित होऊनही मोबदल्याची रक्कम अद्याप जिल्हा परिषदांकडे जमा केली नाही. यामुळे ‘सीएससी-एसपीव्ही’अंतर्गत कार्यरत आपले सरकार सेवा केंद्रांवरील संगणक परिचालकांना त्यांच्या कामाचा मोबदला अदा करता आला नाही. दरम्यान, ३० आॅगस्ट २०१९ च्या अधिसुचनेनुसार ग्रामपंचायतींकडून रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून नोटीस दिल्या जात आहेत. परंतु या प्रक्रियेस दीड ते दोन महिन्याचा अवधी लागणार असल्याने तसेच दिवाळीचा सण तोंडावर असल्याने आरजीएसएने त्यांच्याकडे जमा असलेली ८५ कोटी ७९ लाखांची रक्कम अग्रीम स्वरूपात ‘सीएससी-एसपीव्ही’ यांना अदा करावी. त्यातून आपले सरकार सेवा केंद्र चालकांचा थकीत मोबदला अदा करण्यात यावा, अशा सूचना कार्यासन अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिम