शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

प्रगत शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत उद्यापासून संकलित मुल्यमापन चाचणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 8:08 PM

वाशिम : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठी घेतली जाणारी संकलित मूल्यमापन चाचणी बुधवार, ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेतली जाणार ही चाचणी ११ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची प्रगती तपासणार चार दिवस चालणार चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठी घेतली जाणारी संकलित मूल्यमापन चाचणी बुधवार, ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेतली जाणार ही चाचणी ११ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या चाचण्यांची पूर्वतयारी झाली असून, प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी मंगळवारी दिली.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. सदर उपक्रम फलदायी ठरत आहेत की नाही तसेच विद्यार्थ्यांची प्रगती तपासणीसाठी संकलित मुल्यमापन चाचणी सर्व शाळांमध्ये घेतली जाते. प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा  अर्थात इंग्रजी आणि विज्ञान या विषयांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. ८ नोव्हेंबर रोजी प्रथम भाषा विषय, ९ नोव्हेंबरला गणित, १० नोव्हेंबरला इयत्ता तिसरी ते आठवीचा इंग्रजीचा पेपर आणि ११ नोव्हेंबर रोजी इयत्ता सहावी ते आठवीचा विज्ञानचा पेपर होणार आहे. ही परीक्षा केवळ राज्य मंडळांच्या शाळांकरिता राहणार असून सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश राहणार नाही. प्रत्येक शाळेला चाचणीचे पेपर रवाना करण्यात आले आहेत. प्रत्येक शाळेने आपापल्या केंद्रांवरून पेपर प्राप्त झाले किंवा नाही याची खात्री करावी. आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन, अतिरिक्त प्रश्नपत्रिकांची मागणी शाळांनी अगोदरच कळवावी, अशा सूचनाही शाळांना दिलेल्या आहेत, अशी माहिती मानकर यांनी दिली. ८ ते ११ नोव्हेंबरदरम्यान होणाºया या चाचणीची पूर्वतयारी झाली असून, चाचणीसाठी शिक्षण विभाग व शाळा सज्ज आहेत, असे शिक्षणाधिकारी मानकर यांनी सांगितले.

टॅग्स :educationशैक्षणिकSchoolशाळाStudentविद्यार्थी