बोगस शेतमाल साठवणुकीला बसणार आळा!

By Admin | Updated: December 8, 2014 01:35 IST2014-12-08T01:35:40+5:302014-12-08T01:35:40+5:30

सात-बारासह इतर कागदपत्रांचीही करावी लागणार पूर्तता: शेतकरी आता वळणार खासगी गोदामांकडे.

Come sit in storage of bogus goods! | बोगस शेतमाल साठवणुकीला बसणार आळा!

बोगस शेतमाल साठवणुकीला बसणार आळा!

संतोष वानखडे / वाशिम
बोगस शेतमाल साठवणुकीला चाप लावण्यासाठी आता वखार महामंडळाने शेतमाल साठवणुकीची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. वखार महामंडळात शेतमालाची साठवणूक करण्यासाठी सात-बाराप्रमाणेच आता चालू वर्षीचा पेरेपत्रक, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्डची सत्यप्रत्य, मोबाइल नंबर आदींची पूर्तता करावी लागणार आहे.
शेतमाल साठवण्याची व्यवस्था प्रत्येक शेतकर्‍याकडे असते असे नाही. शेतकर्‍यांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून शेतमाल साठवणुकीसाठी गोदामांची व्यवस्था शासन तसेच खासगी व्यवस्थापनांकडून केली जाते. खासगीपेक्षा शासनाची साठवणुकीची प्रक्रिया सुलभ असल्याने बहुतांश शेतकरी वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये शेतमालाची साठवणूक करतात. शेतकर्‍यां प्रमाणेच व्यापारी व साठेबाजही गोदामांमध्ये शेतमालाची साठवणूक करतात. यापूर्वी केवळ सा त-बारा आणि २0 रुपयांचे प्रतिज्ञापत्र दिले की, वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये शेतमालाची साठवणूक करण्याची प्रक्रिया पूर्ण होत असे. साठेबाज हुडकून काढण्यासाठी गेल्या १९ नोव्हेंबरपासून वखार महामंडळाने शेतमाल साठवणुकीची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. आता सात-बाराप्रमाणेच शेतकर्‍यांना चालू वर्षाचे पेरेपत्रक, रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदान कार्डची सत्यप्रत्य द्यावी लागते. चालू वर्षाच्या पेरेपत्रकाप्रमाणे शेतमालाची आवक आहे किंवा नाही, याचा अंदाज घेतला जातो. वखार महामंडळाने साठेबाजांवर आळा घालण्यासाठी इतरही कागदपत्रांची पूर्तता करण्याचे फर्मान सोडले असल्याने याचे काही विपरीत परिणामही होऊ शक तात. वखार महामंडळाची प्रक्रिया किचकट झाल्याचे भासवून अनेक जण आता खासगी गोदाम व्यवस्थापनाकडे मोठय़ा संख्येने वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासगी व्यवस्थापनाकडे पेरेपत्रक, आधार कार्ड किंवा इतर अत्यावश्यक माहिती देण्याचे बंधन नसते. या पृष्ठभूमीवर वखार महामंडळाच्या गोदामांकडे किती शेतकरी वळतात, यावर यशापयश अवलंबून आहे.

Web Title: Come sit in storage of bogus goods!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.