शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

सीएमआरसीचे अस्तीत्व धोक्यात

By admin | Updated: April 3, 2015 02:29 IST

शासनाचे उदासीन धोरण : बचतगट चळवळ संपविण्याचे षडयंत्र.

बुलडाणा : महिला बचतगट चळवळ सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्या महीला आर्थिक विकास महामंडळामार्फत चालविल्या जाणारे लोकसंचालीत साधन केंद्राला (सीएमआरसी) दिला जाणारा ७0 टक्के निधी मागील ६ महिन्यापासून मिळाला नसल्याने राज्यातील ३१५ लोकसंचालीत साधन केंद्रातील मानधनावरील शेकडो कर्मचार्‍यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या माध्यमातून बचतगटांची ही चळवळच संपुष्टात आणण्याचे शासनाचे धोरण दिसत आहे. ग्रामीण भागातील महिलांना मुख्य प्रवाहात आणून बचत गटाच्या माध्यमातून त्यांचे संघटन करणे, त्यांना सामाजिक आणि आर्थिक व राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करणे आणि महत्वाचे म्हणजे महिलांनी स्वत:चे उद्योग उभे करून स्वत:च्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्याबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावावा म्हणून बचत गटाची ही चळवळ सक्षम करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात लोकसंचालीत साधन केंद्राची (सीएमआरसी) स्थापना करण्यात आली आहे. या साधन केंद्रातील व्यवस्थापक, लेखापाल सहयोगीनी यांचे मानधन व सेवा शुल्क आणि बचत गटासाठी लागणारा प्रशिक्षण खर्च असे ७0 टक्के अनुदान राज्य शासन देत असते. या माध्यमातून बचतगट तयार होऊन एक प्रकारे महिला सक्षमीकरणाला मोलाचा हातभार लागत आहे. मात्र मागील ६ महिन्यापासून शासनाने हे अनुदानच न दिल्यामुळे बचतगटाची ही चळवळ ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. *अनुदानाबाबत निर्णय नाही प्राप्त माहितीनुसार, मुंबई येथे २७ फेब्रुवारी रोजी महिला आर्थिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत साधन केंद्रांच्या अनुदानासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. राज्यातील १३ शहरांमध्ये ३१५ सीएमआरसी काम करीत असून, आतापर्यंंत ११ हजार १६१ गावांमध्ये ही चळवळ पोहोचली आहे. या बचत गटाच्या माध्यमातून २९३ . ४ कोटी रुपयाची बचत आजपर्यंंत झाली आहे.