शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी घंटागाड्या

By admin | Updated: October 22, 2014 00:21 IST

स्वच्छतेसाठी रिसोडात ५ घंटागाड्या.

रिसोड (वाशिम) : शहर स्वच्छतेसाठी रिसोड शहरात ५ घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिपक इंगोले यांनी हिरवी झेंडी दाखवून शहरातील विविध प्रभागामध्ये घंटागाड्या पाठविल्या आहेत. रिसोड शहरातील अनेक प्रभागामध्ये घाणीचे व कचर्‍याचे साम्राज्य पसरलेले होते. परिणामी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शहर स्वच्छतेसाठी घंटागाड्या सुरु करण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. मुख्याधिकारी इंगोले यांनी घंटागाड्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला. शहर स्वच्छतेसाठी घंटागाडीचे महत्त्व पटवून दिले. इंगोले यांनी केलेल्या पाठपुरावाची दखल वरिष्ठ दरबारात घेण्यात आल्याने रिसोड शहरात पाच घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. शहरातील विविध प्रभागात सकाळीच केरकचरा उचलण्यासाठी घंटागाडी जात आहे. ओला व सुका कचरा या घंटागाडीमध्ये उचलून कचर्‍याचे व्यवस्थापन केले जात आहे. शहरवासीयांनी घरातील कचरा घंटागाडीमध्ये टाकावा व स्वच्छतेसाठी नगर पालिका प्रशासनाला सहकार्य करावे अशी साद मुख्याधिकारी दिपक इंगोले यांनी शहरवासीयांना घातली आहे.