शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस चौक्या बंद, गुन्हेगारी वाढली

By admin | Updated: November 16, 2014 01:52 IST

वाशिम शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढतोय: कर्तव्यावरील कर्मचा-यांना चौक्यांची अँलर्जी, प्रशासनाचे दुर्लक्ष.

नागेश घोपे/वाशिम

       महाराष्ट्राच्या नकाशावर संवेदनशील म्हणून लालबत्तीत टिमटिमणार्‍या वाशिम शहरातील पोलिस चौक्या आजमितीला चक्क बुजगावणे बनल्या आहेत.पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष तथा कार्यरत बीट जमादारांना झालेल्या ह्यअँलर्जीह्णमुळे सदर चौक्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी, कायदा व सुव्यवस्थेवरील पोलिसांची पकड सैल झाली असून, शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. शिवाजी चौकातील पोलिस चौकी वगळता इतर चौक्या अपवादानेच उघडल्या जातात. एवढेच नव्हे तर येथे कर्तव्य बजावत असलेले अधिकारी, कर्मचारी या चौक्यांकडे ढुंकुणही पाहत नसल्याचे सर्वश्रृत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सौदागरपुरा, लाखाळा व क्रांती चौकातील पोलिस चौकीचे अस्तित्वच नामशेष झाले आहे. इतर चौक्याही सद्यस्थितीत शेवटचे आचके देत आहेत.

बसस्थानकावर पोलिस चौकीच नाही!

 स्थानिक बसस्थानकावर अद्याप पोलिस चौकी उभारण्यात आलेली नाही. परिणामी, येथे दिवसागणिक चोरट्यांचा धुमाकूळ वाढत चालला आहे. शहर पोलिस स्टेशन प्रशासनाकडून येथे दररोज दोन पोलिसांची ड्युटी लावण्यात येत असते; परंतु सदर पोलिसांना बसण्यासाठी येथे चौकीच नसल्यामुळे त्यांना कर्तव्य बजावताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

*जिल्हा रूग्णालयातील चौकी बेवारस

 स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने येथे पोलिस चौकी निर्माण केली आहे. या चौकीवर काही पोलिसांची ड्युटीही लावण्यात येते; मात्र बर्‍याचवेळा येथील पोलिस कर्मचारी दांडी मारत असल्यामुळे पोलिस चौकी बेवारसच राहत असल्याचे दिसून येते.

*लाखाळ्यावरील चौकीचे भिजत घोंगडे

गत दोन वर्षांपूर्वी रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असताना लाखाळा परिसरातील पोलिस चौकी जमिनदोस्त करण्यात आली होती. त्यावेळी हीच चौकी नगर परिषदेच्या खाली जागेवर बांधण्यात येणार असल्याचे बोलल्या जात होते; मात्र दोन वर्ष उलटून गेले असले तरी, अद्याप ही चौकी उभी राहिलेली नाही. या परिसरात शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय आहे. त्यामुळे विद्यालयात ज्ञानार्जन करणारे बहुतांश विद्यार्थी याच परिसरात राहतात. या विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच वादावादी सुरू असते. सन २00८ मध्ये अश्याच एका वादावादीच्या घटनेत संतोष वानखेडे या तरूणाची हत्या झाली होती. त्यानंतरही लाखाळा चौकात बर्‍याच घटना घडल्याचे सर्वश्रृत आहे. परिणामी, येथे पोलिस चौकीची नितांत गरज आहे. सदर चौकी सुरू करण्यात यावी, यासाठी या परिसरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे; मात्र अद्याप याची दखल घेतल्या गेली नाही.