शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

शाळांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 3:23 PM

वाशिम : ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देया अभियानांतर्गत जिल्हा परिषदेसह खासगी शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. शेलुखडसे, काटा, रिठद यासह अन्य ठिकाणी स्वच्छताविषयक कार्यक्रम घेण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरूवात झाली आहे. या अभियानांतर्गत जिल्हा परिषदेसह खासगी शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. १९ सप्टेंबर रोजी शेलुखडसे, काटा, रिठद यासह अन्य ठिकाणी स्वच्छताविषयक कार्यक्रम घेण्यात आले. स्वच्छतेसंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, गाव हगणदरीमुक्त करणे, शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसर स्वच्छ ठेवणे, सर्वांना स्वच्छतेच्या सवयी लावणे याबरोबरच स्वच्छतेबाबत लोकचळवळ उभी करणे आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जात आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, तालुकास्तरीय विविध विभागातील वर्ग एक ते तीन दर्जाचे अधिकारी, कर्मचाºयांना जिल्ह्यातील एक, एक गाव नेमून देण्यात आले आहे. या अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग घेणे, गृहभेटी, ग्रामसभा, डिजिटल रथ, कलापथक आणि निगराणी समितीमार्फत शौचालयाच्या वापराबाबत जनजागृती करणे तसेच शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र व उपकेंद्र आदींना भेटी देणे, शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छतेचा जागर आदी कार्यक्रमाचे नियोजन आहे. १९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील शाळांमध्ये स्वच्छताविषयक कार्यक्रम घेण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा