कोरोना आपत्ती व्यवस्थापनाला नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 05:23 PM2020-03-18T17:23:56+5:302020-03-18T17:24:11+5:30

नागरिकांनी शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक स्थळी जाणे शक्यतोवर टाळले आहे.

Citizens' Response to Corona Disaster Management | कोरोना आपत्ती व्यवस्थापनाला नागरिकांचा प्रतिसाद

कोरोना आपत्ती व्यवस्थापनाला नागरिकांचा प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘कोरोना व्हायरस’च्या संभाव्य धोक्यापासून सावधगिरीचा उपाय म्हणून, जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक स्थळी जाणे शक्यतोवर टाळले आहे. सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द केले असून, काहींनी विवाह समारंभ पुढे ढकलले आहेत.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेला रुग्ण आढळला नसला तरी सावधगिरीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी गर्दीच्या कार्यक्रमांना प्रतिबंध घालण्याचे आदेश यापूर्वीच दिले होते. त्यानुषंगाने जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, उत्सव, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आदी गर्दीचे कार्यक्रम रद्द केले आहेत. एरव्ही दररोज सकाळच्या वेळी गर्दीने गजबजणारे जिल्हा क्रीडा संकुल आता सामसुम दिसत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहे बंद ठेवल्याने गर्दीला आपसूकच पायबंद असला आहे. खूपच गरज असेल तरच कामानिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालयात जावे अन्यथा इ-मेल, व्हॉटस्अपच्या माध्यमातून निवेदन, तक्रारी मांडाव्या असे आवाहनही जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी १६ मार्चला केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शासकीय, निमशासकीय कार्यालयात जाणे नागरिकांनी टाळल्याने गर्दी कमी झाल्याचे १८ मार्च रोजी दिसून आले. 
 
कुकुटपालन व्यवसायाला आधार देण्याची मागणी
रिसोड : कोरोनाच्या भीतीमुळे उद्धवस्त झालेल्या कुकुटपालन व्यवसायाला सहाय्य मिळावे, व्यावसायिकांना शासनाने आधार द्यावा, अशी मागणी भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूपंत भुतेकर यांनी १८ मार्च रोजी शासनाकडे केली. 
कोरोना व्हायरसच्या चुकीच्या अफवेमुळे जिल्ह्यातील शेतीपुरक असणाºया कुकुटपालन व्यवसायाचे पुर्ण  कंबरडे मोडले गेले. कुकुटपालन व्यवसाय करणाºया शेतकºयांचे कधी नव्हे एवढे नुकसान झाले असुन शासनाने  व्यवसाय वाचविण्यासाठी तथा शेतकºयांना धीर देण्यासाठी व्यवसाय करणाºयांच्या पाठिशी उभे राहावे, अशी मागणी भुतेकर यांनी केली. 
 
विवाह समारंभ पुढे ढकलले
 ‘कोरोना व्हायरस’च्या पृष्ठभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून काहींनी विवाह समारंभ वर-वधूच्या कुटुंबियापुरते मर्यादीत ठेवले तर काहींनी विवाह समारंभ पुढे ढकलले आहेत.

Web Title: Citizens' Response to Corona Disaster Management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.