शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष वाचविण्यासाठी नागरिकांचा पुढाकार

By admin | Updated: April 17, 2017 02:29 IST

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा : रस्ता रुंदीकरणाचे काम, वृक्षतोड थांबविण्याची मागणी

वाशिम : शहर सौंदर्यीकरण, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वाशिम शहरातील काही झाडांवर ‘कुऱ्हाड’ चालणार आहे. यासंदर्भात सिव्हिल लाइनसह अन्य भागातील नागरिकांनी वृक्ष वाचविण्यासाठी पुढाकार घेत शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, रविवारीदेखील वृक्षप्रेमींनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून वृक्ष वाचविण्याची मागणी केली.वाशिम शहरात रस्ता रुंदीकरण व सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान, रस्ता रुंदीकरणासाठी मार्गालगत असलेली झाडे तोडली जाणार असल्याची माहिती आहे. गत दोन वर्षाआधी आंबेडकर चौक ते नगर परिषद चौक रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले, तेव्हादेखील त्या रस्त्यावरील ४० ते ५० झाडे कापण्यात आली होती. ते अद्याप लावण्यात आलेली नाही. आता पुन्हा आंबेडकर चौक ते सिव्हिल लाइन रस्त्यावरील झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. एकीकडे शासन कोट्यवधी झाडे लावण्याचा उपक्रम राबवित असतांना दुसरीकडे वृक्षतोड होत असल्याने याकडे जिल्हाधिकारी तसेच संबंधितानी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सिव्हिल लाइन भागातील रहिवासी तथा जय बजरंग मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्याशी चर्चा केली. डॉ. बाबासाहेब अांबेडकर चौक ते सिव्हिल लाइन, जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान रस्ता रुंदीकरण काम करताना वृक्षतोड होऊ नये, अशी मागणी केली.तसेच सिव्हिल लाइन भागातील रस्ता रुंदीकरणाच्या निमित्ताने होणाऱ्या वृक्षतोडीला थांबविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन १५ एप्रिल रोजी राजे उदाराम कॉलनी, सिव्हिल लाइन भागातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनासह संबंधितांना दिले आहे.रस्ता रुंदीकरण कार्यक्रमांतर्गत सिव्हिल लाइन भागात रेखांकन झाले आहे. या भागात रस्त्याच्या दुतर्फा अनेक वर्षांपासून झाडे आहेत. जवळपास विविध १६० वृक्ष या रस्त्यावर असून, या वृक्षाची तोड रस्ता रुंदीकरणासाठी होऊ शकते, अशी शक्यता निवेदनातून नागरिकांनी वर्तविली. वृक्षतोड होऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली. राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्था, वाशिमच्यावतीने १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वृक्षतोड थांबविण्याची मागणी केली. शहरातील आंबेडकर चौक ते सिव्हिल लाइन या भागातील नगर परिषद प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. त्यानुसार रस्ता रुंदीकरण, सौंदर्यीकरण करताना वृक्षांची कत्तल होणार आहे. या बाबीचा निषेध करत राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय संस्था, वाशिमच्यावतीने वृक्षतोड थांबविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.