‘आॅनलाईन फार्मसी’च्या विरोधात 'केमिस्ट' संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 15:57 IST2019-01-08T15:57:26+5:302019-01-08T15:57:50+5:30
वाशिम : आॅनलाईन औषध विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांच्यावतीन देशभर पुकारलेल्या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील औषध विक्रेते मोठ्या संख्येने ८ जानेवारी रोजी झाले होते.

‘आॅनलाईन फार्मसी’च्या विरोधात 'केमिस्ट' संघटनेचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आॅनलाईन औषध विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांच्यावतीन देशभर पुकारलेल्या आंदोलनातवाशिम जिल्ह्यातील औषध विक्रेते मोठ्या संख्येने ८ जानेवारी रोजी झाले होते. या आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास ६०० औषध विक्रेत्यांनी सहभागी घेतल्याचा दावा औषध विक्रेता संघटनेने केला.
आॅनलाईन औषधीसाठी केंद्र सरकार हे प्रस्तावित मसुदा घेऊन येत आहे. त्याविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने यापुर्वी अनेकवेळा आंदोलने केली. ज्यामध्ये तीन वेळा भारत बंद (औषधी विक्रेता), मुक मोर्चा, ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आले; परंतु आजपर्यंत याविषयी सरकारने कुठलीही ठोस भुमिका घेतलेली नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ८ जानेवारी रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनात जिल्ह्यातील औषध विक्रेते सहभागी झाले होते. चेन्नई हायकोर्ट, दिल्ली हायकोर्टाने आॅनलाईन औषधी विक्री बंद करावी, असा आदेश मध्यंतरी दिला होता. मात्र, सरकार याबाबत गांभीर्याने विचार करीत नाही, असा आरोप करीत प्रस्तावित अधिसूचनेचा मसूदा रद्द करण्याची मागणी औषध विक्रेत्यांनी केली. वाशिम येथे मूक मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. वाशिम येथील आंदोलनात सर्व औषध विक्रेते सहभागी होते, असा दावा औषध विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील शिरसाट, सचिव नंदकिशोर झंवर यांनी केला.