शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

बदलत्या शैक्षणिक धोरणाविरूद्ध वाशिम जिल्ह्यातील संघटना एकवटल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 6:40 PM

वाशिम: शिक्षण विभागाचे बदलते धोरण व शिक्षणाबद्दल शासनाने बाळगलेली उदासिनता, वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय काढून शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेला गोंधळ, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला घातक निर्णय, आदींविरूद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक मंडळ व शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यासंदर्भात शनिवारी पार पडलेल्या सहविचार सभेत चर्चा करण्यात आली. 

ठळक मुद्देसंस्थाचालकही आक्रमक जिल्हास्तरीय सभेत विविध विषयांवर चर्चा

वाशिम: शिक्षण विभागाचे बदलते धोरण व शिक्षणाबद्दल शासनाने बाळगलेली उदासिनता, वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय काढून शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेला गोंधळ, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला घातक निर्णय, आदींविरूद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक मंडळ व शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यासंदर्भात शनिवारी पार पडलेल्या सहविचार सभेत चर्चा करण्यात आली. या सभेच्या अध्यस्थानी शिक्षण संस्था महामंडळाचे विभागीय अध्यक्ष अ‍ॅड. किरणराव सरनाईक होते. संस्था संचालक मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब सोमटकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब काळे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विनोद नरवाडे, विमाशी संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश नंदकुले, विदर्भ संघटनेचे सचिव प्रा. टी.बी. राठोड, शिक्षकेत्तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पसारकर, विमाशिचे विनायक उज्जैनकर, मुख्याध्यापक संघाचे सचिव विजयराव शिंदे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण क्षेत्रात होत असलेले किचकट बदल, लादल्या जाणाºया जाचक अटी, शासनाचे नवनविन धोरण, वारंवार येणारे शासन निर्णय, शिक्षणाबद्दलची उदासीनता व शिक्षणाचे झालेले व्यापारीकरण, ग्रामीण क्षेत्रातील तसेच कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेला गोंधळ, आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.१३ जानेवारी २०१८ रोजी ‘बदलते शैक्षणीक धोरण’, या विषयावर वाशिम येथे होणाºया अधिवेशनासंदर्भात सभेत नियोजन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. किरणराव सरनाईक म्हणाले, की शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी एकत्रीत येवून गोरगरीबाचे शिक्षण वाचविण्यासाठी शासनाच्या जाचक व अन्यायकारक धोरणांविरूद्ध आवाज उठवायला हवा. शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या अन्यायाविरूद्ध सर्व शिक्षण संस्था, संघटना, समाज घटकांनी १३ जानेवारीच्या अधिवेशनासाठी  एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले़  या बैठकीस अशोक कांबळे, नारायणराव काळबांडे, गोविंद चतरकर, श्रीकृष्ण सोलव, मिलींद कव्हर, पी.डी. देशमुख, क. बा. जोशी, सुनील ढेकळे, सुनील कोंघे, केशव म्हातारमारे, विठ्ठलराव सरनाईक, बी.टी. बिल्लारी, भगवानराव गायकवाड, राजेश खाडे, पी.व्ही. कापुरे, राजेश संगवई, परमेश्वर व्यवहारे, रंजना देशमुख, विजया सरनाईक, आसाराम गिते, सुरेशचंद्र करनावट आदींसह विविध शिक्षण संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते़  सभेचे संचालन विजुक्टाचे जिल्हाध्यक्ष अनिल काळे यांनी केले; तर आभार काळबांडे यांनी मानले़.

टॅग्स :washimवाशिम