शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

शेतमालाची आयात रोखण्यासाठी सरकारी धोरणात बदल आवश्यक!-योगगुरू रामदेव बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 2:01 AM

कारंजा लाड : शेतक-यांना सुखी करण्यासाठी शेतमालाची देशात होणारी आयात रोखणे गरजेचे आहे. यासाठी सरकारी धोरणात बदल आवश्यक आहे, असे प्रतिपादन योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी कारंजा येथील शेतकरी मेळाव्यात २७ फेब्रुवारी रोजी केले.

ठळक मुद्दे योगगुरू रामदेव बाबांचे प्रतिपादन : कारंजा येथील शेतकरी मेळावा उत्साहात

लोकमत न्युज नेटवर्ककारंजा लाड : शेतक-यांना सुखी करण्यासाठी शेतमालाची देशात होणारी आयात रोखणे गरजेचे आहे. यासाठी सरकारी धोरणात बदल आवश्यक आहे, असे प्रतिपादन योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी कारंजा येथील शेतकरी मेळाव्यात २७ फेब्रुवारी रोजी केले.आमदार राजेंद्र पाटणी यांच्या पुढाकाराने पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती, युवा भारत, पतंजली किसान सेवा समिती तसेच भारत स्वाभिमान यांच्या आयोजित कारंजा येथील महावीर ब्रम्हचारी आश्रम परिसरात आयोजित  शेतकरी मेळाव्याला राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्याचे कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार राजेंद्र पाटणी, पतंजली योग समितीचे रूपेश लढा विष्णू भुतडा, किसान सेवा समितीचे राज्य प्रभारी राधेश्याम धूत, महिला पतंजली योग्य समितीच्या भारती शेंडे, शंकर नागापुरे, राम व्यवहारे, भाजपा तालुका अध्यक्ष राजीव काळे आदींची उपस्थिती होती. स्वामी रामदेव बाबा म्हणाले की, शेतकºयांनी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीचा वापर करावा. कमी खर्च लागणारे अलवेरा, गुळवेल, आवळा, कोरफळ आदी वनस्पतींसारखी पिके घेऊन शेती करावी. या वनस्पतीला आम्ही भाव देऊन शेतकरी सुखी बनवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. आपल्या देशामध्ये विदेशी शेतकºयांची हकालपट्टी झाली पाहिजे. आपण पाळलेल्या गाईचे गोमूत्र आम्ही ८ ते १० रुपये लिटरने विकत घेतो. गायीच्या तुपालासुद्धा महत्त्व असल्याचे सांगून, गोमूत्रावरसुद्धा प्रक्रिया करून आरोग्यासाठी गोमूत्राचे महत्त्व विषद केले. शेतकºयांच्या हितासाठी किसान सेवा समिती पुढे होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदानाची गरज असल्याने विद्यमान सरकार शेतकºयांसाठी योजना बनवेलच, असा आशावादही रामदेव बाबांनी व्यक्त केला. आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामुळे कांरजा शहरात येण्याचा योग आला असल्याचा आवर्जुन उल्लेख करत योगगुरूने आमदार पाटणी यांचे आभार व्यक्त केले. यावेळी रामदेव बाबांनी उपस्थिताना योगाचे धडे दिले तसेच व्यसनमुक्त या विषयावर मार्गदर्शन केले.प्रास्ताविकेतून आमदार पाटणी यांनी कारंजा तालुक्यातील शेतकºयांची परिस्थिती मांडली. आपल्या किसान पतंजली समितीकडून शेतकºयांना मदतीची गरज आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या शेतकºयांना धीर देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. यानंतर पाशा पटेल म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून शेतकरी हा शेतात राबराब राबत आहे. तरीसुद्धा संसाराचा आर्थिक खर्च शेतीवर भागवू शकत नाही. यामुळे शेतकºयांना आत्महत्या करावी लागते. शेतकºयांच्या या परिस्थितीला सरकारी धोरण जबाबदार आहे. भारत सरकारने पशुधनासाठी दहा हजार कोटी रुपयांचे बजेट केले आहे. जीवन सुखी करण्यासाठी शेतकºयांनी पशुधनाचा वापर करून सेंद्रिय शेती करावी, असा सल्ला त्यांनी दिला. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रत्येक शेतकºयाने कमी खर्चात शेती करून सेंद्रिय शेतीकडे वळावे, असा सल्ला दिला. शेतकरी मेळावा व अन्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार राजेंद्र पाटणी मित्र मंडळ, पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती, युवा भारत व पतंजली किसान सेवा समिती, भारत स्वाभिमान व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी सेंद्रिय शेती करणाºया शेतकºयांचा सन्मान रामदेव बाबा यांनी केला. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता. मेळाव्याला शेतकºयांसह महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती. 

टॅग्स :washimवाशिमYogaयोग