सत्यशोधक मंचाद्वारे शेतकरी मेळाव्यात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 07:46 PM2017-09-07T19:46:08+5:302017-09-07T19:46:08+5:30

सामाजिक क्षेत्रात जनजागृती एक  चळवळ, या भूमिकेतून स्थापन झालेल्या सत्यशोधक  मंचाच्या शाखेची स्थापना खिरपुरी येथे झाल्याची  घोषणा शेतकरी मेळाव्यामध्ये मंचाचे केंद्रीय समिती  संयोजक डॉ. राजेश तायडे यांनी केली. पावसाचे  चुकलेले गणित व त्यामुळे पिकांवर झालेला विविध  किडींचा प्रादुर्भाव, शासनाने जाहीर केलेल्या  पीककर्ज माफीबद्दलच्या माहितीचा अभाव तसेच  म.फुले जीवनदायी आरोग्य योजनेबाबत जनजागृती  निर्माण करण्याचे हेतूने खिरपुरी येथे रविवार, ३ स प्टेंबर रोजी शेतकरी मार्गदर्शन मेळावा पार पडला.

Public awareness in farmers' rally through Satyashodak Manch | सत्यशोधक मंचाद्वारे शेतकरी मेळाव्यात जनजागृती

सत्यशोधक मंचाद्वारे शेतकरी मेळाव्यात जनजागृती

Next
ठळक मुद्देखिरपुरी येथे सत्यशोधक मंचाची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सामाजिक क्षेत्रात जनजागृती एक  चळवळ, या भूमिकेतून स्थापन झालेल्या सत्यशोधक  मंचाच्या शाखेची स्थापना खिरपुरी येथे झाल्याची  घोषणा शेतकरी मेळाव्यामध्ये मंचाचे केंद्रीय समिती  संयोजक डॉ. राजेश तायडे यांनी केली. पावसाचे  चुकलेले गणित व त्यामुळे पिकांवर झालेला विविध  किडींचा प्रादुर्भाव, शासनाने जाहीर केलेल्या  पीककर्ज माफीबद्दलच्या माहितीचा अभाव तसेच  म.फुले जीवनदायी आरोग्य योजनेबाबत जनजागृती  निर्माण करण्याचे हेतूने खिरपुरी येथे रविवार, ३ स प्टेंबर रोजी शेतकरी मार्गदर्शन मेळावा पार पडला.
बळीराजासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात  आले असल्याची माहिती रवी मसने यांनी मेळाव्याचे  प्रास्ताविकात दिली.
शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज  पीककर्ज माफी योजनेबद्दल श्रीकांत खाडे, सहकार  अधिकारी यांनी पीककर्ज माफीसाठीची पात्रता,  निकष, प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे याविषयी विस् तृत मार्गदर्शन केले. तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्नांना  उत्तरे दिली. म. फुले जीवनदायी आरोग्य योजनेमधील  विविध आजार, त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया,  आवश्यक माहिती, प्रक्रिया याबाबत जिल्हा वैद्यकीय  अधिकारी डॉ. श्रीकांत टेकाडे व डॉ. विनायक चकोर  यांनी मार्गदर्शन करून, शंका समाधान केले.  पंजाबराव कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ गहू संशोधक  नीलकंठ पोटदुखे यांनी गहू पिकाबद्दल माहिती आ पल्या अध्यक्षीय भाषणात दिली. कार्यक्रमाला अध्यक्ष  म्हणून सरपंच मनोरमा सिरसाट यांनी मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमात सत्यशोधक मंचाच्या खिरपुरी  शाखेच्या प्रथम पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा पार  पडला. अध्यक्ष महेंद्र जढाळ, उपाध्यक्ष सोमेश्‍वर  कवळकार, सचिव दत्तात्रय जामोदकार, सहसचिव  नितीन मसने, तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून  सखाराम वरणकार, विलास दांदळे, अनंता गणोरकार  यांच्या नावांची घोषणा मंचाचे संस्थापक डॉ. प्रवीण  लोखंडे यांनी केली.
मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उमरी शाखेचे अध्यक्ष  गजानन धामणकर, अजय चिंचोलकार, प्रचारक  मंगेश गणोरकार, सत्यशोधक सतीश मसने, मधुसुदन  धनोकार, महेंद्र दिंडोकार, दीपक आसोलकार, पवन  ढेंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Public awareness in farmers' rally through Satyashodak Manch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.