महावितरणसमोर कृषीपंपांचे ‘आॅटो स्विच’ हटविण्याचे आव्हान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 15:15 IST2018-05-15T15:15:15+5:302018-05-15T15:15:15+5:30
वाशिम : जिल्ह्यातील तब्बल ४६ हजाराच्या आसपास कृषीपंपांना ‘आॅटो स्विच’ बसलेले आहेत. हे ‘आॅटो स्विच’ हटविण्यासंबंधी महावितरणला मात्र अद्याप यश प्राप्त झालेले नाही.

महावितरणसमोर कृषीपंपांचे ‘आॅटो स्विच’ हटविण्याचे आव्हान!
वाशिम : जिल्ह्यातील तब्बल ४६ हजाराच्या आसपास कृषीपंपांना ‘आॅटो स्विच’ बसलेले आहेत. यामुळे वीज उपकेंद्रांसह रोहित्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असल्याने ऐन हंगामात रोहित्र जळण्याच्या प्रमाणातही वाढ होते. हे ‘आॅटो स्विच’ हटविण्यासंबंधी महावितरणला मात्र अद्याप यश प्राप्त झालेले नाही.
वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यात महावितरणच्या कृषीपंपधारकधारक ग्राहकांची संख्या ५१ हजार २६८ आहे. त्यापैकी जवळपास ४६ हजार शेतकºयांनी शेतांमधील मोटारपंपांना ‘आॅटो स्विच’ बसविले आहेत. मध्यंतरी महावितरणने धडक मोहिम राबवून त्यातील काही ‘आॅटो स्विच’ हटविले होते. मात्र, परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली असून सद्या शेतशिवारांमध्ये पाणी नसल्याने सिंचनाची कामे बंद आहेत. अशा स्थितीत कृषीपंपांचे ‘आॅटो स्विच’ हटविणे सहजशक्य असल्याने ही मोहिम महावितरणने पूर्ण गतीने राबवावी, अशी मागणी काही सुज्ञ शेतकºयांमधून जोर धरत आहे.