शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विषय समितींच्या नियुक्तीसाठी चढाओढ

By admin | Updated: February 23, 2015 02:11 IST

भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी लागले कामाला.

विवेक चांदुरकर / वाशिम: राज्यात सत्ताबदल होताच कृषी विभाग तसेच महसूल विभागातील विविध समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती होण्यासाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. आपल्या गटातील पदाधिकार्‍यांनाच या समित्यांवर नियुक्ती मिळावी, यासाठी या पक्षातील विविध नेते प्रयत्न करीत आहेत. केंद्रात व राज्यात भाजप- शिवसेनेची सत्ता आली आहे. या सत्तापरिवर्तनाने दोन्ही पक्षातील नेते व पदाधिकार्‍यांसह कार्यकर्तेही उत्साहित झाले आहेत. सोबतच सत्तेची फळे चाखावयास मिळणार असल्याने मनोमन सुखावले आहेत. गत पंधरा वर्ष सत्तेपासून दूर असल्यामुळे त्यांना शासनाच्या विविध समित्या व पदांपासून दूरच राहावे लागले होते. राज्यात पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्यामुळे आता दोन महिन्यांत तालुकास्तरापासून तर राज्यपातळीपर्यंत शासकीय मंडळासह विविध समित्यांवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. संजय गांधी निराधार योजना, समन्वय समिती, दक्षता समिती, रोजगार हमी योजना समिती, महिला व बाल विकास प्रकल्प, कायदेविषयक सल्लागार समितीसाठी कार्यकर्त्यांच्या नेमणुका होणार आहेत. यासोबतच मलिदा लाटणार्‍या कृषी विभागातील ह्यआत्माह्णसह अन्य समित्यांवर नियुक्ती होण्यासाठी पदाधिकार्‍यांची धडपड सुरू झाली आहे. आत्मा समिती ही प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर असते. कृषी व्यवसायातील नवनवीन संशोधन शेतकर्‍यांपर्यंत पोहोचावे, याकरिता या समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समित्यांवर कायद्यानुसार सर्वच पक्षांतील नेते व पदाधिकार्‍यांचा समावेश असायला हवा; मात्र सत्ताधारी पक्षातील पदाधिकार्‍यांनाच यामध्ये स्थान मिळते, हे उघड सत्य आहे. दोन वर्षांसाठी नेमलेल्या जिल्हय़ातील आत्मा समितीची मुदत मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे राज्यात यावेळी या समित्यांवर भाजप आणि शिवसेना या पक्षातील नेत्यांचा समावेश असणार आहे. राज्यात तब्बल पंधरा वर्षांनंतर भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत आहे. कार्यकर्ते व नेते आपापल्या परीने कोणत्या पदावर कशी वर्णी लागेल, याचा विचार करीत आहेत. अनेकांनी आपल्या मर्जीतील नेत्यांना व प्रमुखांना गळ घालण्याचे काम सुरू केले आहे. यात महायुतीच्या पदाधिकार्‍यांपासून तर कार्यकर्त्यांपर्यंंत आपल्या परीने फिल्डिंग लावण्यात येत आहे.