शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सभापती, उपसभापतींवरील अविश्वास ठराव बहुमताने पारित!

By admin | Updated: April 19, 2017 01:10 IST

रिसोड : येथील पंचायत समिती सभापती, उपसभापतींवरील अविश्वास ठरावावर मंगळवार, १८ एप्रिल रोजी शून्य विरुद्ध १२ सदस्यांनी एकमत दर्शविल्याने ठराव बहुमताने पारित झाला.

रिसोड पंचायत समिती : १८ पैकी १२ सदस्यांनी लावली हजेरीरिसोड : येथील पंचायत समिती सभापती, उपसभापतींवरील अविश्वास ठरावावर मंगळवार, १८ एप्रिल रोजी शून्य विरुद्ध १२ सदस्यांनी एकमत दर्शविल्याने ठराव बहुमताने पारित झाला. यायोगे याप्रकरणी व्यक्त होणाऱ्या शंका, कुशंकांनाही पूर्णविराम मिळाला आहे.पंचायत समिती सभापती प्रशांत खराटे आणि उपसभापती विनोद नरवाडे हे सदस्यांना विश्वासात न घेता कारभार चालवित असल्याचा ठपका ठेवत महादेव ठाकरे, शारदा आरु, केशव घुगे, कमल करंगे, गजानन बाजड, छाया पाटील, श्रीकांत कोरडे, नागो गव्हाळे, चंद्रकला बांगरे, ज्योती मोरे, यशोदा भाग्यवंत, कावेरी अवचार या १२ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे १२ एप्रिल रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवार, १८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी निवडणूक पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या अधिपत्याखाली सभा बोलावली होती; मात्र यावेळी १८ पैकी १२ सदस्यच उपस्थित राहिल्याने सभापती, उपसभापतींवर शून्यविरुद्ध १२ असा बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. ठराव मंजूर झाल्याने सभापती व उपसभापतींची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे लवकरच नवीन सभापती, उपसभापतींच्या निवडीसाठी विशेष सभा बोलविल्या जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. सभेचे कामकाज उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार अमोल कुंभार, गटविकास अधिकारी डी.एस.मकासरे यांनी पाहिले. महादेव ठाकरे, छाया पाटील यांची नावे चर्चेत!रिसोड पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापती पदावर भाजपाच्या छाया पाटील आणि उपसभापती म्हणून शिवसेनेचे महादेव ठाकरे आरूढ होतील, अशी चर्चा सध्या रिसोड तालुक्यातील राजकीय वर्तुळात रंगत आहे.