वेदनेवर मायेचं पांघरून टाकून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:20+5:302021-07-31T04:41:20+5:30
गौरव राठोड हा खान्देशातील नाशिक शहरात राहणाऱ्या कुटुंबातील अनाथ बालक असून त्यांच्या आई-वडिलांचे कोरोना काळात निधन झाले. त्यामुळे ...

वेदनेवर मायेचं पांघरून टाकून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा
गौरव राठोड हा खान्देशातील नाशिक शहरात राहणाऱ्या कुटुंबातील अनाथ बालक असून त्यांच्या आई-वडिलांचे कोरोना काळात निधन झाले. त्यामुळे निराधार झालेल्या बालकाला गावातील शालूबाई राठोड यांनी त्यांच्या घरी आणून त्यांची संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. त्या विधवा असतानासुद्धा निराधार बालकाची संगोपनाची जबाबदारी स्वीकारल्याने त्या महिलेचे कौतुक होत आहे. तर निराधार बालकाला मदत कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला. मग गावातील शिवसेनेचे दिनेश राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गौरव राठोड या १० वर्षीय मुलास सायकल व शैक्षणिक साहित्य आदी वस्तू भेट देत निराधार मुलास आधार देऊन वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी दिनेश राठोड, गजानन अमदाबादकर, प्रमोद गायकवाड यांची उपस्थिती होती.