कारंजा शहर पोलीसाचे वाहन ' दे धक्का '
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 15:15 IST2018-07-18T15:15:05+5:302018-07-18T15:15:17+5:30
गावात कोणती घटना घडल्यास किंवा शहरात फेरफटका मारण्यासाठी जाण्याआधी चारचाकी वाहणाला धक्का देउन चालू करावे लागते.

कारंजा शहर पोलीसाचे वाहन ' दे धक्का '
कारंजा लाड : कारंजा शहर पोलीस विभागाचे चार चाकी वाहन नादुरूस्त असल्याने पोलीस विभागाला कोणत्या गावात कोणती घटना घडल्यास किंवा शहरात फेरफटका मारण्यासाठी जाण्याआधी चार चाकी वाहणाला धक्का देउन चालू करावे लागते. त्या बरोबर पोलीस स्टेशनचा टेलीफोन सुध्दा बंद आहे. याकडे गंभीर समस्याकडे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
कारंजा शहर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी फिरते पोलीस स्टेशन या अंतर्गत कार्यक्रम घेण्यासाठी ग्राम खेर्डा या ठिकाणी गेले असता, वाहणाला धक्का देउन चालू करावे लागत असल्याचा प्रकार पुढे आला. या समस्या कडे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी लक्ष दयावे अशी मागणी होत आहे.