शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दर करार खरेदीवर शिक्कामोर्तब!

By admin | Updated: February 13, 2016 02:01 IST

वाशिम जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा एकमुखी ठराव.

वाशिम: दर करार (आरसी) की ई-निविदेद्वारे साहित्य खरेदी, यावरून जिल्हा परिषदेत रंगलेल्या नाट्यावर अखेर शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत पडदा पडला. कृषी, समाजकल्याण यासह अन्य विभागांची साहित्य खरेदी ही बाजार दराशी तुलना केल्यानंतर शासनाच्या दर करारानुसार करण्याचा एकमुखी ठराव पारित झाला. जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात पार पडलेल्या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद, सभापती चक्रधर गोटे, सुभाष शिंदे, ज्योती गणेशपुरे, पानुताई जाधव यांच्यासह सदस्य व विभागप्रमुखांची उपस्थिती होती. सुरुवातीलाच जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांची दुरवस्था व रिक्त पदे यावर चर्चा झाली. जि.प. सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी विठोली जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. ही शाळा वाचविण्यासाठी शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी केली. सदर पदे कशा पद्धतीने भरता येतील, याबाबत उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, चक्रधर गोटे, देवेंद्र ताथोड, उस्मान गारवे यांनी चर्चेत सहभाग घेतला. हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याच्या सूचना गणेश पाटील यांनी शिक्षणाधिकार्‍यांना केल्या. विविध विभागाच्या साहित्याची खरेदी ई-निविदा की दर कराराने करायची यावर चर्चा झाली. बाजारभावातील दराशी दर कराराची पडताळणी करून, कमी दराने साहित्य पुरवठा करणार्‍या कंत्राटदाराकडून दर कराराने साहित्य खरेदी करण्याला सभागृहाने मान्यता दिली. जि.प. सदस्य रत्नप्रभा घुगे यांनी शेतकर्‍यांच्या धुर्‍यावर सामूहिक पद्धतीने तार कुंपण देण्याचा मुद्दा उपस्थित केला; मात्र यासाठी ठोस निधी उपलब्ध नसल्याने तार कुंपण देण्यात अडचणी येण्याची शक्यता संबंधित विभागाने वर्तविली. यावर हेमेंद्र ठाकरे यांनी सर्वांना खरोखरच तळमळ असेल तर शिल्लक असलेला पाच कोटी ८६ लाखांचा निधी तार कुंपण या शीर्षकाखाली वळता करता येऊ शकतो, असा उपाय सुचविला.