शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

एकबुर्जी प्रकल्पाच्या भिंतीला झुडपांचा विळखा

By admin | Updated: August 19, 2014 23:33 IST

लघुसिंचन विभागाचे कमालीचे दुर्लक्ष : निवासस्थानाची सोय असलेले अधिकारी कर्मचारी असतात तरी कुठे

वाशिम : शहराला पाणीपुरवठय़ाची जबाबदारी गेल्या ४0 वर्षांपासून सर्मथपने पेलणार्‍या एकबुर्जी प्रकल्पाच्या भिंतीवर झाडा, झूडपांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. झाडांची ही वाढती संख्या प्रकल्पाच्या भिंतीसाठी धोकादायक नाही का असा प्रश्न या निमीत्ताने उपस्थित होत आहे. ६0 वर्षापूर्वी केकतउमरा शिवारात चंद्रभागा या उपनदीला अडवून एकबुर्जी प्रकल्पाची निर्मीती करण्यात आली होती. निर्मीतीवेळी त्या भागातील सिंचनाची सोय होण्यासाठी या मध्यम प्रकल्पाची निर्मीती करण्यात आली होती. निर्मीतीनंतर २0 वर्षाने एकबुर्जी प्रकल्पापासून ६ किलोमिटर अंतरावर असलेल्या वाशिम या शहराला पाणिपुरवठा करण्याचीही जबाबदारी याच मध्यम प्रकल्पावर सोपविण्यात आली. गेल्या ४0 वर्षापासून हा एकबुर्जी प्रकल्प वाशिमकरांची तहाण भागविण्याची जबाबदारी आपल्यातील जलसाठय़ाच्या भरवश्यावर सांभाळत आले. गतवर्षी याच प्रकल्पावरुन वाशिम शहराला वाढिव पाणीपुरवठाही सुरु करण्यात आला. केकतउमरा शिवारातील हजारो हेक्टर जमीन हिरवीगार करण्यासह वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबुर्जी प्रकल्पाच्या भिंतीची देखभाल करण्यात लघुसिंचन विभागाचे मात्र कमालीचे दूर्लक्ष होतांना दिसत आहे. धरणाच्या भिंतिवर पिचिंगला लागून झाडा,झुडपांनी प्रचंड गर्दी केली आहेच. परंतू भिंतीच्या मध्यभागावर रस्त्याच्या दूतर्फा लागवड केल्यागत काटेरी झाडांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या काटेरी झाडांमुळे भिंतीवर वारुळांची सख्यांही वाढत चालली असून पिचींगच्या वरच्या भागाप्रमाणेच भिंतीच्या पाठिमागचा भागही काटेरी झाडांनी प्रचंड प्रमाणात व्यापला आहे. या दाड झाडीचा प्रकल्पाच्या भिंतीला भविष्यात काही धोका नाही का, असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. लघुसिंचन विभाग मात्र यासंबंधी कमाली बेपर्वा दिसत आहे. एकीकडे एकबुर्जी प्रकल्पात यावर्षी अत्यल्प पावसामुळे आजमितीला केवळ २ फुट जलसाठी शिल्लक असल्याची माहिती आहे. या प्रकल्पाची जलसाठा क्षमता जवळपास २८ फूट असून येत्या काही दिवसात पावसाने कृपा न केल्यास एकबुर्जी प्रकल्प मृत जलसाठय़ाची पातळी गाठणार यात शंका नाही.