इमारत बांधकामे ठप्पच!
By Admin | Updated: May 26, 2014 00:24 IST2014-05-25T20:53:34+5:302014-05-26T00:24:27+5:30
शिरपूरजैन येथे नियोजना अभावी शासकीय इमारतीचे बांधकाम ठप्प पडले आहे.

इमारत बांधकामे ठप्पच!
शिरपूर जैन : येथील दुय्यम निबंधक कार्यालय, तलाठी कार्यालय व तसेच ग्राम सचिवालयाच्या इमारतीचे निधी मंजूर अस तानाही देखील बांधकामे मात्र ठप्प पडली आहेत. तालुक्याचे दुय्यम निबंधक कार्यालय शिरपूर येथे आहे. या कार्यालयाच्या नविन इमारत बांधकामासाठी ९७ लाखाचा निधी मंजुर आहे. परंतु ईमारत बांधकामासाठी ग्राम पंचायतने जागा उपलब्ध करुन देवूनही या इमारत कामाला सुरुवात होवू शकली नाही. त्याचप्रमाणे ग्राम सचिवालयाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. यासाठी ग्राम पंचायतचा ६ लाखाचा निधी, जिल्हा परिषदेच्या डिव्हीडीएफ योजनेतून १0 लाखाचे कर्ज घेण्यात आले व उर्वरीत ५ लाख खासदार निधीतून मिळणार होते. परंतु योग्य तो पाठपुरावा न केल्याने खासदार निधी प्राप्त होऊ शकला नाही. त्यातच तत्कालीन ग्रामसेवकाचे २00५ मध्ये निधन झाल्याने या इमारती बांधकामसंबंधी रेकॉर्डच मिळत नसल्याची माहिती ग्रामपंचायतकडून मिळत आहे. १६ लाख रुपये खर्च होवून या इमारतीच्या बांधकामाकडे वरिष्ठ अधिकार्यांचे होणारे दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरत आहे.