शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी

By admin | Updated: August 21, 2014 00:28 IST

कारंजा विधानसभा मतदार संघ १९७८ मध्ये अस्तित्वात आला; ७ वेळा बाहेरील उमेदवाराला प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली.

कारंजा : कारंजा विधानसभा मतदार संघ १९७८ मध्ये अस्तित्वात आला असून या मतदार संघात आतापर्यंत आठ उमेदवाराने प्रतिनिधीत्व केले. मात्र या मतदार संघाने ७ वेळा बाहेरील उमेदवाराला प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. सन २00९ च्या निवडणुकीत कारंजा मानोरा मतदार संघात स्थानिक उमदेवारांना दुप्पट मते देवून विजयी केले. हा मतदार संघ राखीव नसल्याने सर्वसाधारण करिता खुला असल्याने होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाची उमेदवारी करिता प्रत्येक पक्षाकडे भाऊगर्दी दिसून येत आहे. कारंजा विधानसभा मतदार संघात प्रभावीत असणारे पक्ष यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय कॉग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भारिप बहुजन महासंघ, बसपा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्षाकडून निवडणुक लढविण्यास उमेदवार इच्छुक आहे. मात्र कोणता पक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उभा करतो हे निश्‍चित नसले तरी इच्छुकांनी मात्र चांगलीच फिल्डींग लावली आहे. सध्या या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे आमदार प्रतिनिधीत्व करीत आहेत. या मतदारसंघासाठी २५ उमेदवार वेगवेगळया पक्षाची उमेदवारी मागण्यासाठी पक्षाकडे शक्ती प्रदर्शन दाखवित आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी व भारतीय कॉग्रेस पक्षाची युती असल्यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाटेला आहे. राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी विद्यमान नामदार व माजी आमदार व भारतीय जनता पार्टी करिता हा मतदार संघ सुटावा याकरिता भाजपा कार्यकर्ते ताकद लावून आहेत. याकरिता भाजपा सुध्दा सेनेवर दबाव तंत्र आणत असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्यावतिेन काही माजी आमदार, शिवसेना पदाधिकारी , अकोला जि.प.चे काही माजी सदस्य, मानोरा सर्कलचे काही जि.प.सदस्यांसह काही कार्यकर्तेहीइच्छुक आहेत. भारिप किंवा बसपाची उमेदवारी मिळण्याकरिता सुध्दा शहरातील काही दिग्गज तयार असून तशी त्यांनी फिल्डींग लावलेली आहे. कारंजा मानोरा मतदार संघाची विधानसभेची उमेदवारी पक्ष कोणत्या उमेदवाराला जाहीर करतो. त्यावेळी मतदार संघाचे राजकीय समिकरण सांगता येईल. या मतदार संघात २,९७, ८६५, मतदार असून यामध्ये १,४७0८0 पुरुष, १,५0,७८५ महिला आहे. जि.प.एकूण १६ सर्कल तर पंचायत समिती चे ३२ सर्कल असून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळते याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.