हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 18:37 IST2019-01-11T18:36:49+5:302019-01-11T18:37:40+5:30
रिसोड: तालुक्यातील चिखली सरनाईक येथे शेतातील जुन्या वादातून पवन पंडितराव सरनाईक (२३) या युवकाची करणाºया दोन्ही आरोपींना ११ जानेवारी रोजी रिसोड येथील न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.पी. गिरी यांनी दोन्ही आरोपींना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: तालुक्यातील चिखली सरनाईक येथे शेतातील जुन्या वादातून पवन पंडितराव सरनाईक (२३) या युवकाची करणाºया दोन्ही आरोपींना ११ जानेवारी रोजी रिसोड येथील न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.पी. गिरी यांनी दोन्ही आरोपींना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मृतक युवकाचे वडिल पंडितराव सरनाईक व डिगांबर सरनाईक यांच्यात गत १० वर्षांपासून शेतीचा वाद असून, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याच वादातून डिगांबर सरनाईक हे सहकुटुंब चिखली गाव सोडून केशवनगरला वास्तव्याला गेले होते. मात्र, मधल्या काळात शेत वहितीकरिता हे कुटूंब पुन्हा चिखली येथे वास्तव्यास आले. दरम्यान, बुधवारी मृतक पवन याच्याशी त्याचे काका डिगांबर सरनाईक व चुलत भाऊ गजानन सरनाईक यांनी अडवून वाद घातला. त्याचे पर्यवसान हाणामारीत होऊन दोघा बापलेकांनी पवन सरनाईक यास पोटात चाकू भोसकून ठार केले. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून १० जानेवारीलाच अटक केली होती. ११ जानेवारीला दोन्ही आरोपींना रिसोड येथील न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गिरी यांनी दोन्ही आरोपींना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.