पोळ्यापासून बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला, बेंबळा नदीत बुडून मृत्यू

By सुनील काकडे | Updated: September 16, 2023 16:46 IST2023-09-16T16:44:44+5:302023-09-16T16:46:12+5:30

अनंत अशोक रामटेके हे पोळा सणाच्या दिवसापासून बेपत्ता होते. कुटूंबिय, नातेवाईक व गावकऱ्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला

Body found, drowned in Bembala river in washim | पोळ्यापासून बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला, बेंबळा नदीत बुडून मृत्यू

पोळ्यापासून बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला, बेंबळा नदीत बुडून मृत्यू

वाशिम : धनज बु. (ता.कारंजा लाड) येथून जवळच असलेल्या ग्राम रामटेक येथील ३६ वर्षीय इसम पोळा सणाच्या दिवसापासून (१४ सप्टेंबर) बेपत्ता होता. त्याचा मृतदेह बेंबळा नदीच्या पाण्यात शनिवार, १६ सप्टेंबर रोजी आढळला. या घटनेमुळे रामटेक येथे हळहळ व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, अनंत अशोक रामटेके हे पोळा सणाच्या दिवसापासून बेपत्ता होते. कुटूंबिय, नातेवाईक व गावकऱ्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ते कुठेही दिसून आले नाही. यादरम्यान बेंबळा नदीच्या पाण्यात १६ सप्टेंबर रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला. पाय घसरून नदीच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेची धनज पोलिसांनी नोंद घेवून तपासकार्य हाती घेतले आहे.

Web Title: Body found, drowned in Bembala river in washim

टॅग्स :washimवाशिम