५६ युवकांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:48+5:302021-02-05T09:22:48+5:30
काेराेना संसर्ग पाहता यावेळी यात्रा महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. रक्तदान शिबिरासाेबतच कोविडच्या काळात सेवा देणाऱ्या संघटना, डॉक्टर, ...

५६ युवकांचे रक्तदान
काेराेना संसर्ग पाहता यावेळी यात्रा महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. रक्तदान शिबिरासाेबतच कोविडच्या काळात सेवा देणाऱ्या संघटना, डॉक्टर, आशा वर्कर, आरोग्यसेवक यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. सर्वप्रथम श्री संत झोलेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झोलेबाबा संस्थान चिखलीचे विश्वस्त व अध्यक्ष होते. यानंतर लगेच कोविड योद्ध्याचा सत्कार करण्यात आला. या कोविड योद्ध्यामध्ये डॉ. नितीन छोटे, डॉ. भगत, डॉ. आडोळे , डॉ. बोबडे, डॉ. बजाज यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्यसेवक मनून संदीप नप्ते यांचा सत्कार करण्यात आला, तसेच सर्व आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच हिरंगी उपकेंद्राच्या सुवर्णा यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शेलूबाजार परिसरात कोविडच्या भयावह स्थितीत सेवा देणाऱ्या संघटना राजमुद्रा ग्रुप, प्रयास फाउंडेशन, राजे छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ वनोजा, रुग्णसेवा ग्रुप पार्डी ताड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थानचे अध्यक्ष वसंतराव सुर्वे, सचिव मांगुळकर, कोषाध्यक्ष माणिकराव सावके, आनंदराव घुगे, टोपले , योगीराज सुर्वे, मंगरूळपीर ठाणेदार जगदाळे, तुषार जाधव, शालिकराम पाटील राऊत, वाघ काका उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेंद्र राऊत, गोपाल घुगे, विनोद पवार, संतोष सुलताने, सचिन राऊत, अर्जुन सुर्वे, उमेश सुर्वे, हरी चौधरी, राहूल रोकडे, पवन राठी, ओम सं.राऊत, संतोष लांभाडे, चंदू ठाकरे, शुभम डोफेकर, दिनेश फुके, विनायक सुर्वे, राम सुर्वे, मोहन सावके, गोलू सावके, सतीश ठाकरे, विनोद सुर्वे, दत्ता खोरणे, ज्ञानेश्वर डोंगरे, चिंटू जयस्वाल, मदन जयस्वाल, आदेश बोरडे, मयूर ठाकरे, मांगूळकर सर, रुग्णसेवा ग्रुपचे अध्यक्ष शिवा सावके यांनी परिश्रम घेतले.