शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर; महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 17:16 IST

BJP on the road for OBC reservation : आघाडी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसर दणाणून गेला होता.

वाशिम : राज्यात महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात योग्य पावले उचलले नसल्याचा आरोप करीत ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने १५ सप्टेंबर रोजी वाशिमसह जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजु पाटील राजे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले. यावेळी पोलीसांना शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले.महाविकास आघाडी सरकारच्या उदासिनतेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबिसींचे आरक्षण संपुष्टात आले. राज्यात ना. देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वातील सरकारने ओबिसी आंदोलन कायम रहावे यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ही प्रक्रिया ठप्प पाडली. न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली नाही, ओबिसी समाजाची संख्या निर्धारित करण्यासाठी मागासवर्गीय आयोग गठित केला परंतु आयोगाला निधी दिला नाही, कर्मचारी दिले नाही. राज्य सरकारने ओबिसी समाजावर अन्याय केला, आदी आरोप करीत याविरोधात भारतीय जनता पार्टीने एल्गार पुकारला. जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावर जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले. वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात तब्बल तासभर रस्ता रोखून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा निषेध नोंदविला. यावेळी राजु पाटील राजे, जिल्हा महामंत्री नागेश घोपे, ओबिसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, तालुकाध्यक्ष प्रल्हाद गोरे व शहराध्यक्ष राहूल तुपसांडे, अंबादास कालापाड, रामप्रसाद सरनाईक, अनिल ताजणे, शरद चव्हाण, नागोराव वाघ, धनंजय हेंद्रे, धनंजय रणखांब, धनाजी सारस्कर, गणेश खंडाळकर, सुनिल तापडीया, सुनिल चौधरी, डिगांबर खोरणे, जि.प. सदस्या अर्चना खोरणे, अंजली पाठक, भावना सरनाईक, करूणाताई कल्ले, नितेश मलिक यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 घोषणाबाजीने पुसद नाका दणाणदला

वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात सुमारे तासभर रास्तारोको आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक प्रभावित झाली होती. यावेळी आघाडी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसर दणाणून गेला होता.

टॅग्स :washimवाशिमBJPभाजपाOBC Reservationओबीसी आरक्षण