ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर; महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 05:14 PM2021-09-15T17:14:28+5:302021-09-15T17:16:09+5:30

BJP on the road for OBC reservation : आघाडी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसर दणाणून गेला होता.

BJP on the road for OBC reservation; Proclamation against Mahavikas Aghadi | ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर; महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी

ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर; महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी

Next

वाशिम : राज्यात महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात योग्य पावले उचलले नसल्याचा आरोप करीत ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने १५ सप्टेंबर रोजी वाशिमसह जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजु पाटील राजे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले. यावेळी पोलीसांना शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले.
महाविकास आघाडी सरकारच्या उदासिनतेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबिसींचे आरक्षण संपुष्टात आले. राज्यात ना. देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वातील सरकारने ओबिसी आंदोलन कायम रहावे यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ही प्रक्रिया ठप्प पाडली. न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली नाही, ओबिसी समाजाची संख्या निर्धारित करण्यासाठी मागासवर्गीय आयोग गठित केला परंतु आयोगाला निधी दिला नाही, कर्मचारी दिले नाही. राज्य सरकारने ओबिसी समाजावर अन्याय केला, आदी आरोप करीत याविरोधात भारतीय जनता पार्टीने एल्गार पुकारला. जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावर जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले. वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात तब्बल तासभर रस्ता रोखून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा निषेध नोंदविला. यावेळी राजु पाटील राजे, जिल्हा महामंत्री नागेश घोपे, ओबिसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, तालुकाध्यक्ष प्रल्हाद गोरे व शहराध्यक्ष राहूल तुपसांडे, अंबादास कालापाड, रामप्रसाद सरनाईक, अनिल ताजणे, शरद चव्हाण, नागोराव वाघ, धनंजय हेंद्रे, धनंजय रणखांब, धनाजी सारस्कर, गणेश खंडाळकर, सुनिल तापडीया, सुनिल चौधरी, डिगांबर खोरणे, जि.प. सदस्या अर्चना खोरणे, अंजली पाठक, भावना सरनाईक, करूणाताई कल्ले, नितेश मलिक यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 
घोषणाबाजीने पुसद नाका दणाणदला

वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात सुमारे तासभर रास्तारोको आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक प्रभावित झाली होती. यावेळी आघाडी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसर दणाणून गेला होता.

Web Title: BJP on the road for OBC reservation; Proclamation against Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.