दुचाकीची समोरासमोर धडक ; तीन जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 18:21 IST2019-03-12T18:21:12+5:302019-03-12T18:21:46+5:30
कारंजा लाड (वाशिम) - दोन दुचाकींची समारोसमोर धडक होवून त्यात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान कारंजा -मानोरा मार्गावरील वाकी वाघोळा फाट्यानजीक घडली.

दुचाकीची समोरासमोर धडक ; तीन जण गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) - दोन दुचाकींची समारोसमोर धडक होवून त्यात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान कारंजा -मानोरा मार्गावरील वाकी वाघोळा फाट्यानजीक घडली.
प्राप्त माहितीनुसार एम एच ३७, ४०७० व एम एच ३७ आर १२४९ क्रमांकाच्या दुचाकींची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की या धडकेत दोन्ही दुचाकींच्या समोरील भागाचा चकनाचुर झाला. या धडकेत दिपक देवानंद शामसुंदर (२५) वर्ष रा दापुरा, राजेष विठ्ठल शिंदे (२५) रा शहा व अमोल किसन टेमनकर हे तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमीपैकी दोघांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले.