दुचाकी ट्रकवर आदळली; एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 10:54 IST2021-05-12T10:53:50+5:302021-05-12T10:54:05+5:30

Washim Accident News : अतुल मनोहर धाये, रा. वाटपूर, जि. अमरावती असे मृताचे नाव आहे. 

The bike collided with the truck; One killed | दुचाकी ट्रकवर आदळली; एक जण ठार

दुचाकी ट्रकवर आदळली; एक जण ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
धनज बु. : रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ११ मे रोजी कारंजा ते अमरावती रोड व ढंगारखेड चेक पोस्टजवळ घडली. अतुल मनोहर धाये, रा. वाटपूर, जि. अमरावती असे मृताचे नाव आहे. 
कारंजा-अमरावती रोड व ढंगारखेड चेक पोस्टजवळ एम.एच.३१ सी बी ७५८० क्रमांकाचा ट्रॅक हा चालकाने रस्त्याच्या मधोमध उभा केला होता. मागून येणाऱ्या एम एच २७ टी ८१४६ क्रमाकांची दुचाकी त्या ट्रकवर जाऊन धडकली. यात चालक अतुल मनोहर धाये, रा. वाटपूर, जि. अमरावती हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तत्काळ अमरावती येथील सरकारी दवाखान्यात उपचाराकरिता नेले असता त्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. 
ट्रकचालकाच्या निष्काळजीमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने सदर ट्रकचालकावर भादंविच्या कलम २७९, ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 
या घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पो. कॉ. गजानन वानखेडे व डिगांबर राठोड करीत आहेत.
 

Web Title: The bike collided with the truck; One killed