वाशिम जिल्ह्यात गहू, हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 18:02 IST2019-02-09T18:01:29+5:302019-02-09T18:02:04+5:30
वाशिम: रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाच्या काढणीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. यासाठी शेतकºयांची घाई सुरू असून, गहू, हरभºयाच्या काढणीस सुरुवात झाल्याने मजुरांच्या हाताला काम मिळू लागले आहे.

वाशिम जिल्ह्यात गहू, हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात
शेतकºयांची घाई: मजुरांच्या हाताला काम
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाच्या काढणीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. यासाठी शेतकºयांची घाई सुरू असून, गहू, हरभºयाच्या काढणीस सुरुवात झाल्याने मजुरांच्या हाताला काम मिळू लागले आहे.
वाशिम जिल्ह्यात यंदा ९६ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. प्रकल्पांत उपलब्ध असलेल्या जलसाठ्यासह विहिरी आणि कूपनलिकांची पातळी वाढल्याने रब्बी पिकांचे क्षेत्र यंदा वाढले. यंदा ७० हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात हरभरा आणि २८ हजारांवर हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची पेरणी झाली होती. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पेरणी केलेला गहू आणि हरभरा पिक आता काढणीवर आले असून, या पिकांच्या कापणीची घाई शेतकºयांनी केली आहे. यासाठी मजुरांची जुळवाजुळव करण्यासह मळणी यंत्राची तजविजही शेतकरी करीत आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून रोजगाराच्या शोधात असलेल्या शेतमजुरांच्या हाताला काम मिळू लागले आहे. बाजारात नव्या हरभºयाची आवकही सुरू झाली आहे. त्यात जानेवारी महिन्यातील अवकाळी पावसाचा अपवाद वगळता यंदा गहू आणि हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण राहिल्याने उत्पादनही चांगले झाले आहे. दरम्यान, शासनाने यंदा हरभºयासाठी ४६०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केले आहेत. हे हमीभाव आधीच कमी असताना बाजारात सद्यस्थितीत हरभºयाला प्रति क्विंटल ४४०० रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात दराबाबत निराशेचे वातावरण आहे.