शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार वितरणाचा निधी जलसंधारणास!

By admin | Updated: April 10, 2017 01:39 IST

कारंजा लाड- पुरस्काराची रक्कम पाणी फांउडेशन कडून राबविण्यात येणा-या वॉटर कप स्पर्धेनिमित्त होणा-या जलसंधारणाच्या कामास देण्याचा निर्णय धर्मराज एज्युकेशन सोसायटी कारंजाने घेतला आहे.

कारंजा लाड : पुरस्कार वितरण सोहळा व पुरस्काराची रक्कम पाणी फांउडेशन कडून राबविण्यात येणा-या वॉटर कप स्पर्धेनिमित्त होणा-या जलसंधारणाच्या कामास देण्याचा निर्णय धर्मराज एज्युकेशन सोसायटी कारंजाने घेतला आहे.धर्मराज एज्युकेशन सोसायटी कारंजाद्वारा दरवर्षी स्व.मोहनराव मुरकुटे स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रातील मान्यवरांना रोख व स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात येते. त्यासाठी राधा मोहन मुरकुटे, पार्थ मुरकुटे व उत्कर्ष मुरकुटे हे पुढाकार घेतात व कारंजा शहरात भव्य दिव्य आयोजन केले जाते. त्यासाठी मुरकुटे कुटुंब बरीच पदरमोड करतात. हा समारंभ म्हणजे परिवाराचा भावनिक सोहळा समजला जातो. दरवर्षी विदर्भस्तरीय पुरस्काराचे प्रस्ताव आमंत्रित करणे, निवड समिती सभा आयोजीत करणे व ११ एप्रिलला प्रत्यक्ष पुरस्कार वितरण समारंभ असतो. त्यासाठी अतिथी, त्यांचे मानधन व स्नेहभोजन यावर बराच खर्च होतो. पण या खर्चातून सामाजिक बांधीलकी घट्ट होते. पण काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी यावर्षी हा सर्व पैसा जलसंधारणाच्या कामांना देण्याचा निर्णय घेऊन इतरांसमोर आदर्श निर्माण केला. सत्यमेव जयते वॉटर कपच्या प्रसार व प्रचारासाठी, जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी राधाताई मुरकुटे यांनी स्वत: चार दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करून गावात जाऊन सभा घेणे, गावक-यांना जलशिवार, जलसंधारण, जलसाक्षरता यावर मार्गदर्शन करण्याचे कार्य हाती घेतले. आता धर्मराज सोसायटीच्या पुरस्कार वितरण सोहळा व पुरस्काराची रक्कमदेखील जलसंधारणाच्या कामांना देण्याचे घोषित केले आहे.