नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर कर्जमाफीची प्रतीक्षाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 03:18 PM2019-09-17T15:18:17+5:302019-09-17T15:18:34+5:30

दीर्घ प्रतिक्षेनंतर प्रोत्साहनपर रक्कम मिळत नसल्याने शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

Awaiting loan waiver for regular loan farmers! | नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर कर्जमाफीची प्रतीक्षाच !

नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर कर्जमाफीची प्रतीक्षाच !

Next

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कजार्ची नियमित परतफेड करणाºया पश्चिम वºहाडातील जवळपास १७०० ते १८०० शेतकºयांना अद्याप प्रोत्साहनपर कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. दीर्घ प्रतिक्षेनंतर प्रोत्साहनपर रक्कम मिळत नसल्याने शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
मे व जून २०१७ या महिन्यात पीक कर्जमाफीसाठी विविध टप्प्यात आंदोलने झाल्याने राज्य सरकारने जून महिन्यात कर्जमाफीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१७ अखेर थकबाकीदार शेतकºयांना १ लाख ५० हजार पर्यंत कर्जमाफी व १ लाख ५० हजार वरील शेतकºयांना वनटाईम सेंटलमेंट योजना लागू केली तसेच २०१५-१६- २०१६-१७ या वर्षात ज्या शेतकºयांनी कजार्ची नियमितपणे परतफेड केली अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार पर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याचे घोषीत केले. या प्रोत्साहनपर लाभासाठी वाशिम जिल्ह्यातील कार्ली, कोंडाळा, कळंबेश्वर परिसरातील ४०० पेक्षा अधिक शेतकºयांनी लढा उभारला आहे. पात्र असूनही बँकेच्या चुकीमुळे प्रोत्साहनपर लाभ मिळत नसल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे. अकोला जिल्हयात जवळपास ५५ङ्म, बुलडाणा जिल्हयात जवळपास ८०० शेतकºयांचे प्रोत्साहनपर अनुदान तांत्रिक अडचणीत अडकल्याची माहिती आहे.
 
प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम तातडीने देण्याच्या सूचना बँक प्रशासनाला दिल्या आहेत. काही अडचण असल्यास शेतकºयांनी बँक प्रशासनाशी संपर्क साधावा.
- रमेश कटके
जिल्हा उपनिबंधक, वाशिम


आम्ही पीककजार्ची नियमित परतफेड करतो. मात्र, अद्याप आम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नाही. याबाबत संबंधितांकडे विचारणा केली आहे; परंतु समाधानकारक उत्तर मिळत नाही.
- व्दारकाबाई घमराव देशमुख
कार्ली ता. जि. वाशिम
.........

Web Title: Awaiting loan waiver for regular loan farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.